ग्रामपंचायत रनमोचन – ळजोळणीच्या नावाने लूटमार

30

🔹शासनातर्फे मोफत मिळणाऱ्या नळ जोळणीसाठी “डिपॉजिट” च्या नावाने एक हजार रुपये वसुली..!

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.11जून):-महाराष्ट्र सरकार कडून ठरविण्यात आलेल्या नळ जोळणी योजना घराघरात पोहचावी या उदांत हेतूने मोफत नळ जोळणी योजना राबविल्या जात आहे मात्र ब्रह्मपुरी तालुक्यातील रनमोचन ग्रामपंचायत च्या वतीने तब्बल डिपॉजिट म्हणून एक हजार रुपये वसूल केल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे यामुळे गावपातळीवरील आवश्यक असलेल्या नळ कनेक्शन धारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे विदारक चित्र ग्रामपंचायत रणमोचन येथे पाहण्यात येत आहे.

जिल्हा परिषद चंद्रपूर १५ व्या वित्त आयोगातून ही योजना असून पंचायत समिती ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या रनमोचन ग्रामपंचायतीला शासनाकडून प्रत्यक्ष मोफत कनेक्शन देण्याचे आदेश देण्यात आलेले असतांना ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे डिपॉजिट म्हणून तब्बल “एक हजार रुपये द्या त्यानंतरच नळ कनेक्शन घ्या” असे आदेश जारी केल्याने सामान्य नागरिकांना कनेक्शन घेताना कमालीचा त्रास होत आहे
शासनाकडून अशा प्रकारचे कोणतेही आदेश नसताना या ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय योग्य आहे का हा प्रश्‍न विचारात घेण्यात सारखाच आहे यावर प्रशासनाने गंभीर दखल घेऊन सदर ग्रामसचीव अथवा इतर दोषीवर कारवाई करावी अशी चर्चा आता गावपातळीवर होऊ लागली आहे.

*सदर नळ कनेक्शन बाबत ग्रा. पं. ग्रामसचिव श्रीमती मनीषा महाकाळकर यांना माहिती विचारली असता त्यांनी हा निर्णय ग्रामपंचायतीचा असल्याचे सांगितले कुणा एकट्या कडून रक्कम वसूल केली जात नसून ही रक्कम सर्वांकडूनच वसूल केली जाईल असेही त्यांनी सांगितले. प्रतिनिधीने तुमच्याकडे असा जी आर आहे का…?असे विचारणी केले असता प्रत्येक गोष्टीला जी.आर लागतो का असे खडतडं उत्तर त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिले*

प्रतिक्रिया:-

ही नळकनेक्शन योजना 100% मोफत आहे मात्र ग्रामपंचायतचा नैतिक अधिकारातून वर्षभरात पाणी फुकट वापरासाठी शंभर टक्के रक्कम म्हणून ग्रामपंचायत आपल्या अधिकारातून डिपॉझिट रक्कम घेऊ शकते मात्र शासनाकडून नवीन नळ कनेक्शन धारकांना योजना मोफत देण्याचा शासनाचा आदेश आहे

(डॉक्टर शिरीष रामटेके
संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती ब्रम्हापुरी)