वंचित बहुजन आघाडी पुसद तालुका वतीने मा. मुख्याधिकारी यांना निवेदन

33

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.11जून):- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक हा मुख्य बाजारपेठ असलेला चौक असल्याने येथे आठवडाभर व सकाळी ते रात्री प्रर्यंत वर्दळ असते.ह्या चौकामध्ये भाजी विक्रेते,लोट गाडे,व ग्रामीण भागातून आलेले कास्तकार असतात.परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी ह्या विक्रेत्यांची गर्दी असते,व दोन्ही बाजूस रस्ता अरुंद असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.दिवसभर विक्रेते तिथे बसून असल्याने पुतळ्याच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारी विक्रीस बसणाऱ्यास बंदी घालावी.अन्यथा अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन जबाबदार असेल.अश्या आशयाचे निवेदन मा.धनंजय गायकवाड जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यवतमाळ यांच्या आदेशानुसार व जिल्हा मुख्यमहासचिव मा.डी.के.दामोधर,जिल्हा संघटक मा.राजकुमार टाळीकुटे व बुद्धरत्न भालेराव पुसद तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद पुसदचे मा.मुख्याधिकारी साहेब पुसद यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी तालुका उपाध्यक्ष दीपक पदमे,पुसद शहराध्यक्ष शे.मुक्तार शे.निजाम,स्वप्निल पाईकराव,प्रकाश खिलारे,प्रसाद खंदारे,दिलीप टाळीकुटे,बिपीन हरणे,शे.आसीम,डॉ.मोसीन खान,साकीब भाई,डुबा देवकते,अंजिक्य कांबळे,विशाल डाके,विपुल भवरे,विकास कोल्हे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.