26 जून ला आरक्षण हक्क समितीचे आंदोलन : नियोजन बैठक सम्पन्न

    38

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    चंद्रपुर(दि.14जून):-आरक्षण हक्क कृती समितीच्या कोअर कमिटी व राज्य प्रतिनिधीच्या राज्य स्तरिय आनलाईन बैठकीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांमध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनी शनिवार दिनांक 26 जून रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर व मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने रविवारी 13 जून रोजी ब्यारिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन येथे चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व मागासवर्गीय संघटना, सामाजिक संघटना, राजकीय संघटना यांची संयुक्त बैठक घेण्यात आली या बैठकीत 17 विविध संघटनाच्या सदस्यांची समनवय समितीचे गठन करण्यात आले.

    तसेच येत्या 16 जून रोजी दुसरी व्यापक बैठक मातोश्री सभागृह ,तुकूम, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली आहे त्यात सर्वसमावेशक मोर्चा कृती समिती गठीत करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.एससी एसटी या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीतील आरक्षण कमी केल्यामुळे बहुजनावर अन्याय झाला आहे यामुळे राज्यातील 60 संघटना एकत्रित आल्या असून आरक्षण हक्क कृती समितीची स्थापना करण्यात आली या समितीच्या वतीने 26 जून ला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला .त्या संदर्भात नियोजन करण्याच्या अनुषंगाने काल बैठक घेण्यात आली.

    बैठकीच्या अध्यक्षस्थानी बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन आफ इंडिया, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजकुमार जवादे ,प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहुजन एम्प्लॉइज फेडरेशनचे सल्लागार सुभाष मेश्राम,प्रमुख उपस्थिती अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण खोब्रागडे, समता सैनिक दलाचे अशोक टेंभरे,आल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनचे सरचिटणीस विजय तोडासे ,रमेश कुंभरे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष शालीक माहुलीकर, प्रजासत्ताक शिक्षक संघटनेचे ऍड .रवींद्र मोटघरे, आयबीसेफचे एस डी सातकर,कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे देवराव नगराळे, आंनद कांबळे, सतीश कौरासे,महाराष्ट्र राज्य विद्युत बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे डॉ आर एच वर्धे इत्यादि पदाधिकारी उपस्थित होते