अभाविप वरोरा शाखेच्या मिशन आरोग्य रक्षक अभियानाचा प्रारंभ

101

✒️वरोरा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरोरा(दि.14जून):-अ.भा.वि.प. तर्फे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात *”मिशन आरोग्य रक्षक”* हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात व विविध शहरी भागात प्रामुख्याने अभाविपचे कार्यकर्ते हे आरोग्यसेवा या सोबतच *थर्मल स्क्रिनिंग, ऑक्सीजन चेकअप, जंतुनाशक फवारणी व लसीकरणा बाबत* जनजागृती करणार आहेत. या अभियानाचा प्रामुख्याने हेतू येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा संभावित धोका जाणून घेता ग्रामीण भागात असणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे, 100% लसीकरण करणे व यातील लक्षणे आढळून आल्यास योग्य वेळी आरोग्य तपासणी करून घेणे व कोरोनाला आपल्या गावापासून व आपला शहरापासून दूर ठेवणे हाच मुख्य उद्देश आहे.

यात जिल्हाभरातील अभाविपचे कार्यकर्ते विविध गांवात जाऊन हे अभियान करणार आहेत. यात जिल्हाभरातील जवळपास 140 कार्यकर्ते हे आपापल्या स्थानी हे अभियान करणार आहे.या अभियानाची सुरुवात *वरोरा* तालुक्यातील *वनोजा व चरुरखटी* या गावापासून सुरु करण्यात आली. व या दोन्ही गांवातील एकूण एक हजार दोनशे सत्तर घराणं मध्ये जंतुनाशक फवारणी करण्यात आली व तीन हजार आठशे पन्नास लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

 व यावेळी जिल्हा समिती सदस्य शकिल शेख , गणेश नक्षिणे , नगर मंत्री तृप्ती गिरसावळे, महाविद्यालय प्रमुख लोकेश रुयारकर, रवी शर्मा, सौरभ साखरकर, प्रीतम निमकर, छकुली पोटे, स्वाती हनुमंते, छकुली गेडाम, अक्षता माहुरे, शिवानी लेडांगळे, सानिया पठाण, निधी राखुंनडे, सायली पोटदुखे,कोमल निखाडे,प्राची ढोके आदि अभाविप कार्यकर्त्यांची व गांवातील नागरिकांची उपस्थिती होती.