भगवंता कोरोनाची तिसरी लाट येऊ देऊ नको, अमरसिंहांची जनतेशी नाळ कायम – ना. मुंडे

20

✒️गेवराई,तालुका प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.14जून):-कोरोनाची ही महामारी अत्यंत गंभीर आहे. कोरोना अनेकांनी अनुभवला आहे, अनेकांच्या घरातले कर्ते माणसे देवाघरी गेली आहेत. या भयावह परिस्थितीत आपल्या माणसांना आधार देण्यासाठी गेवराई तालुक्यात पहिले खासगी क्वॉरंटाईन सेंटर सुरू करण्याचे धाडस आ. अमरसिंह पंडितांनी केले ते गेवराईकरांच्या सेवेसाठी कायम तत्पर असतात. त्यांचा निवडणुकीत पराभव झाला असला तरी त्यांची जनतेशी नाळ कायम आहे. म्हणूनच ते आज बीड जिल्ह्यातील कोविड योद्धांचा सन्मान करत आहेत.

सन्मानाचा पहिला मानही गेवराईकरांनीच मिळवा. पहिल्या लाटेत माणुसकी गेली, दुसर्‍या लाटेत ती जीवंत झाली आता तिसरी लाट नको, भगवंत करो, कोरोनाची तिसरी लाट येऊ देऊ नये. असं म्हणत तिसरी लाट रोखायची असेल तर मास्क लावणे, सोशल डिस्टन्स पाळणे, सातत्याने हात धूणे हे आपल्याला करावेच लागेल, असे स्पष्ट मत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.