गेवराई शहरातील पाणी पुरवठा बारा दिवसापासून खंडित भर पावसाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

33

✒️नवनाथ आडे(गेवराई प्रतिनिधी)

गेवराई(दि.14जून):-शहराचा पाणी पुरवठा बारा दिवसापासून खंडित झाला असून भर पावसाळ्यात नागरिकांना हंडा भर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे नगर परिषद च्या ढिसाळ कारभाराचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे
भर उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता भासली नाही
मात्र पावसाळ्यात पाणी पाणी करण्याची वेळ गेवराई शहर वासीयावर ओढावली आहे पाणी पुरवठा विभागातील कर्मचारीचार्याकडे पाण्यासबंधी कसली माहिती विचारणा करायची असल्यास मोबाईल क्रमांक बंद असतो.

त्यामुळे माहिती मुख्ख आधिकारी यांच्या कडे घेण्याची वेळ नागरिकांना आली आहे.गेवराई शहरात चार ते पाच दिवसा आड पाणी पुरवठा केला जातो त्यातच काही भागात आठ दिवसा नंतर पाणी पुरवठा होतो त्यामुळे नागरीकात नगर परिषद विरुद्ध संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे बारा दिवसापासून पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू असल्याची कर्मचारी सांगत आहेत गेवराई शहराचा पाणी पुरवठा कधी सुरळीत होणार असा प्रश्न नागरिकांना पडत आहे