सचिन चव्हाण याचा सन्मान

52

✒️खामगाव प्रतिनिधी{मनोज नगरनाईक}

खामगाव(दि.15जून):-तालुक्यातिल पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण पिंपळगाव राजा येथे आपली वेगळी छाप ऊमटवली आहे मन ति पेट्रोलिंग असो कि अवैध व्यवसाय दादा असो कि चोर यांचेवर त्यांनी आपल्या कार्य पध्दतीने एक छाप सोडली आहे. नुकताच त्यांना जिल्हा पोलिस प्रशासनाच्यावतिने त्यांचा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवल्याने त्याचा सन्मान करण्यात आला.विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील मोजक्याच पोलिस अधिकार्यांना सन्मान देण्यात आला.

खामगाव ऊपविभागात ग्रामिण क्षेत्रातिल ६मे रोजी पोलिस अधिक्षक अरविंद चावरिया यांचे मार्गदर्शनाखाली सोन्याच्या गिन्या प्रकरणी राबविण्यात आलेल कोंबिग आँपरेशन मध्ये लाखोचा ऐवजासह अट्टल गुन्हेगारांना अटक प्रकरण वरिष्ठ अधिकारी यांचे सह या आँपरेशनची यशस्वी धुरा सांभाळल्याने यासह पिंपळगाव राजा पोलिस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्थेवर करडी नजर ठेऊन अबाधित ठेवल्याने सचिन चव्हाण यांना जिल्हा पोलिस प्रशासनाने सन्मानित केले