एन. ओ. सी. खोटी तयार करून गाडी परस्पर नावावर करून घेतली

23

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.16जून):- येथील महादु किशन इंगळे राहणार तुळजाभवानी नगर गंगाखेड येथील रहिवासी आसुन त्यांनी स्वतची स्विफ्ट डिझायर गाडी एम. एच .46 झेड. 68 77 हे गाडी त्याने एचडीएफसी बँक शाखा पुणे यांच्याकडून 356761,रुपय कर्ज घेऊन गाडी घेतली होती परंतु काही अडचणी मुळे ही गाडी सदरील व्यक्ती सुधाकर रामा इंगळे राहणार तुळजभवानी नगर याला कारनामा करून दिनांक 10/05/2021रोजी त्याच्या ताब्यात दिली व करारनाम्या ठरल्या प्रमाणे दिनांक 14/05/2021प्रयेंत गाडीचे हप्ते भरलेले असून राहिलेले हप्ते सुधाकर रामा इंगळे यानी हप्ते भरण्याचे ठरले.

परंतु सदरील बँके कडून हप्ते भरण्यात न अल्या मुळे नोटीस मिळाली असता महादु किशन यानी चोकशी केली असता असे समजले सुधाकर रामा इंगळे यांनी सदरील गाडी कर्जाची परतफेड न करता गाडी नावावर करून त्या गाडीवर श्रीराम ट्रान्सपोर्ट फायानास कंपनी लिमिटेड नवी मुबंई यांच्या कडून गाडीवर कर्ज घेण्यात आले.

त्या कर्जाचे विवरण कंपनी प्राप्त केले असून महादू किशन इंगळे यांनी एचडीएफसी.बँके चे कर्ज नफेडता एचडीएफसी.बँके शाखा पुणे येथील कर्मचाऱ्याच्या मदतीने खोटा कागद पत्र तयार करून खोटी एन. ओ. सी. तयार करून कुठल्याही टी. टी.फॉर्मवर सही केली नसून सदरील गाडी नावावर काळ्या मुळे माझा विश्वासघात केला आहे सदरील सुधाकर रामा इंगळे व एचडीएफसी.बँके शाखा पुणे येथील कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी असी फिर्याद मा.पोलीस अधीक्षक,पोलीस कार्यालय परभणी .येथे महादु किशन इंगळे या यांनी केली आहे. या वर महादु किसन इंगळे यांची स्वाक्षरी आहे