खेरवाडी सेंटर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामकाजाबाबत खासदार भारतीताई पवार व विलास पाटलांनी मीटिंगमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी

    148

    ✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

    दिंडोरी(दि.16जून):-लोकसभा मतदारसंघातील खासदार भारती ताई पवार व विलास पाटलांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने रेल्वे अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी “.रेल्वे उड्डाण पुलाच्या भोंगळ कारभाराचे पितळ झाले उघडे. आता एकतर रेल्वे गेट उघडेल किंवा उड्डाणपुलाचे काम होणार निश्चित सुरूआज सोमवार दिनांक 14 जून रोजी सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील यांच्या प्रयत्नातून खासदार कार्यालय नाशिक येथे रेल्वे अधिकारी व खेरवाडी ग्रामस्थ यांच्या आयोजित मीटिंगमध्ये उड्डाणपुलाचे काम बंद असताना अडीच महिन्यांपासून रेल्वे गेट विनाकारण बंद ठेवून ठेकेदार खेरवाडी ग्रामस्थांच्या जीवाशी खेळल्याचे उघड झाले.

    संबंधित उड्डाण पुलाच्या कामाची वर्कऑर्डर ही सात जानेवारी 2020 ची होती त्यात 307 दिवसात म्हणजे वर्षाच्या आत काम करणे संबंधित ठेकेदाराला बंधनकारक होते. मात्र वर्कऑर्डर ची मुदत संपली असून सदर उड्डाणपुलाचे काम रेल्वे प्रशासन खाजगी कंपनी द्वारे करत आहे.सदर ठेकेदार हा मयत झाला असल्याचे कारण देत व उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याचे भासवत रेल्वे प्रशासनाला देखील अंधारात ठेवल्याचे उघडकीस आल्याने खासदार भारती ताईंनी संतप्त होऊन यावर तात्काळ निर्णय न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने *रेल्वे ट्रॅक वर बसून आंदोलन करण्याचे बोलून दाखवल्याने व ग्रामपंचायत सदस्य रूपाताई पाटील व विलास पाटील यांच्या इंग्लिश टॉकिंग ने अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

    यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष योगिताताई आवारे, ग्रामसेवक दहिफळे, ग्रामपंचायत सदस्य ॲड. संदीप पवार, सोपान संगमनेरे ,रतन बांडे, उपसरपंच विजय लांडगे ,अरुण संगमनेरे ,कृष्णा लांडगे ,ग्रामस्थ दीपक जाधव, विठ्ठल बुरके, दिलीप संगमनेरे, काशेश्वर संगमनेरे ,अनिल आवारे आदी उपस्थित होते. रेल्वे गेट बंदमुळे खेरवाडी ग्रामस्थांचे होणाऱ्या हाल-अपेष्टा लक्षात घेऊन विलास पाटलांनी खासदार भारतीताई पवारांकडे कैफियत मांडल्याने व खासदार ताईंनी त्यावर तात्काळ परखडपणे ॲक्शन घेऊन ग्रामस्थांना न्याय दिल्याने खेरवाडी ग्रामस्थ व ग्रामपंचायत च्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार