आंदोलनाला सुरू करण्याआधीच पोलिसांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्याना अटक

27

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

जळगाव(दि.16जून):- स्वाभिमानी ची वारी आमदाराच्या दारी या आंदोलनाला दिनांक 16-6-2021 रोजी सुरूवात करण्याआधीच पोलिसांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी प्रशांत डिक्कर विदर्भ अध्यक्ष युवा आघाडी व शेतकऱ्यांना अटक करुन त्यांना पोलीस स्टेशनला आणण्यात आले. स्वाभिमानी ची वारी आमदाराच्या दारी या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणुन स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय श्रीराम कुटे यांच्या घरावर धडकणार होते . स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने आपला हक्क मागण्या करीता व शेतकर्‍याप्रती झोपलेल्या लोक प्रतिनिधी आमदारांना जाग आण्यासाठी त्यांच्या घराजवळ उपस्थित राहणार होते.

परंतु त्या आधीच जिल्ह्यातील आमदारांनी पोलिस प्रशासनावर दबाव आणून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार केला. व आंदोलनापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने प्रशांत डिक्कर विदर्भ अध्यक्ष युवा आघाडी यांनी व्यवस्थेचा जाहीर निषेध केला अटकेच्या निषेधार्थ प्रशांत डिक्कर यांच्या सह कार्यकर्त्यांनी संग्रामपूर पोलिस ठाण्यातच उपोषण सुरुवात केली आहे. हा एकप्रकारे शेतकर्‍याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे असे जनसामान्य जनतेतुन बोलले जात आहे