नोटीशी मागे घ्या, अन्यथा एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा व आकृती हब टाऊन कार्यालयाचा ताबा

🔹रिपाई डेमोक्रॅटिक च्या डॉ माकणीकर यांचा इशारा

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई दि (प्रतिनिधी) आकृती हब टाऊन विकासक विमल शहा नियम न जुमानता मनमाणी करुन गरिबांची घरे बळकावत आहे, हे रोखण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक च्या वतीने विकासकांच्या कार्यालयाचा ताबा लवकरच घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महासचिब डॉ. राजन माकणीकर यांनी संगितले.*

आकृती हब टाऊन विकासक विमल शाह ने झोपडपट्टी निरीक्षण केले, कागदपत्र पडताळणी केली, झोपडी तोडून घेतली, परिशिष्ट बनवले व एमआयडीसी प्रशासनाकडे मंजुरी साठी पाठवले व त्यानंतर एमआयडीसी प्रशासनाने ते परिषस्ट मंजूर केले. असे असतांना आज १५ ते २० वर्षानंतर पुन्हा कागदपत्र तपासण्याची आकृती विकासकाला काय खाज सुटली आहे.

१० दिवसात नोटीस परत घेऊन विकासकाच्या एफएसआय ची फेरतपासणी करून तो एफएसआय ताब्यात घेऊन वंचित पात्र झोपडीधारकांना ताबा नाही दिल्यास, थकीत भाडे धनादेश नाही अदा केल्यास एमआयडीसी कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात येईल असा इशारा डॉ. राजन माकणीकर यांनी दिला आहे.

विकासक विमल शहा ने शासनाच्या प्रकल्पात मास्टर माईड महादलाल मुरजी पटेल सह तत्कालीन काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. आता केवल वालभिंया नावाचा नवीन दलाल या महाघोटाळ्याची सूत्रे सांभाळत आहे या सर्व प्रकरनाची उच्चन्यायालच्या निवृत्त न्यायाधीशमार्फत चौकशी व्हावी. अशी ईच्छा डॉ. माकणीकर व कॅप्टन श्रावण गायकवाड यांनी व्यक्त केली आह.

महाराष्ट्र, मुंबई, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED