वैनगंगा नदीपात्रात महिलेचे प्रेत आढळले

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.19जून):-ब्रह्मपुरी तालुक्यातील रणमोचन(खरकाळा) वैनगंगा नदी काठावर एका महिलेचे प्रेत दिनांक 18 जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता च्या सुमारास आढळून आल्याने खळबळ उडाली होती.सदर घटनेची माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना देण्यात आली ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांनी वेळीच दखल घेत सदर महिलेचे प्रेत ब्रह्मपुरी येथे शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.

सदर महिलेची ओळख पटली असून शालू गिरीधर चंदनखेडे वय (३५)असे मृतक महिलेचे नाव आहे.ही महिला गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे शिवाय देसाईगंज वडसा ला लागून असलेल्या विरशी गावातील तिचे माहेर असल्याची माहिती आहे सदर महिलेने ब्रह्मपुरी वडसा मार्गावरील वैनगंगा नदीवरील पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समजते अधिक तपास ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे