वंचित बहुजन आघाडी ची मागणी दारू विक्री परवाने आर्थिक दुर्बल घटक व ग्रामपंचायत स्तरावर देण्यात यावे

22

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.19जून):-चंद्रपूर जिल्यात मागील सहा वर्षापासून दारू बंदी झालेली होती .मात्र ती दारुबंदी मे 2021 ला उठविण्यात आली .त्यासाठी समिती गठित करून दारू उठविण्याचा निर्णय मंत्रिमंडळात पारित करण्यात आला .या झालेल्या निर्णयाला वंचित बहुजन आघाडीचा विरोध नाही .सहा वर्षाअगोदर दारू बंद झाली असताना सुध्दा दारू विक्री परवानाधारक सुखा-समाधानाने जगत आहेत मात्र ग्रामीण सामान्य व आर्थिक दुर्बल जनता ही बेरोजगारी व भुकेने मरत आहे.

या सर्व बाबींचा विचार करून शासन व प्रशासनाने मागील जुने दारू विक्री परवाने रद्द करून नवीन परवाने हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक , अपंग , आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब , विधवा घटस्पोटीत महिला , शहीद सैनिकांचे कुटुंब, वंचित आदिवासी व मागासवर्गीयांचे कुटुंब तसेच चार पाच ग्रामपंचायती मिळून एक परवाना द्यावा.जेणेकरून त्या त्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढून त्या गावांचा विकास साधल्या जाईल. असा आराखडा तयार करून ते वाटप करावे.

परवाना वाटपासंबंधी एक समिती गठित करून त्या समितीमार्फत परवाने वाटपाची प्रक्रिया राबवावी .
वंचित बहुजन आघाडी तालुका ब्रम्ह्पुरी च्या वतीने शासन व प्रशासनाला मा उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देऊन मागणी करण्यात आली .मागणी पूर्ण न झाल्यास पक्ष्याच्या वतीने न्यायालयीन कार्यवाही सोबत तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुध्दा देण्यात आला .यावेळी डॉ प्रेमलाल मेश्राम , डॉ राहुल मेश्राम , लिलाधर वंजारी , कमलेश मेश्राम , अरुण सुखदेवे , अनिल कांबळे , सुरज मेश्राम , अश्व्जीत हुमने , प्रफुल्ल ढोक, सुमेध वालदे , अनिकेत शेंडे आदि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते .