धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष श्री. संदीप दादा बेडसे यांच्या प्रयत्नाने शिंदखेडा विधानसभा क्षेत्राच्या विकासकामांना ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ साहेब यांची मंजुरी

34

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.19जून):-नेहमीच शिंदखेडा तालुक्याचा विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवत कुठल्या ना कुठल्या माध्यमातून शिंदखेडा तालुक्यासाठी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष श्री संदीप दादा बेडसे निधी आणण्यासाठी यशस्वी ठरले आहेत. तसेच त्यांच्या *शिंदखेडा मतदार संघातील गावांच्या विकासासाठी २५१५ योजनेतून विकासकामांना राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने मंजुरी दिली आहे.* टप्प्याटप्प्याने तालुक्यातील उर्वरित प्रत्येक गावात विकास निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन श्री संदीप बेडसे यांनी दिले आहे. त्यांच्या या विकासाभिमुख दृष्टिकोनाचे गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे.

प्रत्येकी ५ लक्ष रुपये मंजूर असलेली गावे खालीलप्रमाणे.दरखेडा – ५ लक्ष रूपये,अमळथे – ५ लक्ष रूपये,साहुर – ५ लक्ष रुपये,लोहगाव – ५ लक्ष रुपये,जोगशेलु – ५ लक्ष रुपये,हिसपुर – ५ लक्ष रुपये,हुंबर्डे – ५ लक्ष रुपये,मुडावद – ५ लक्ष रुपये,जातोडा – ५ लक्ष रुपये,नरडाणा – ५ लक्ष रुपये,वालखेडा – ५ लक्ष रुपये,खलाणे- ५ लक्ष रुपये,बाभुळदे – ५ लक्ष रुपये,भडणे – ५ लक्ष रुपये,हातनुर – ५ लक्ष रुपये,मांडळ – ५ लक्ष रुपये,अंजनविहीरे – ५ लक्ष रुपये,मेथी – ५ लक्ष रुपये,देगाव – ५ लक्ष रुपये,कामपुर – ५ लक्ष रुपये,अमराळे – ५ लक्ष रुपये,डांगुर्णे – ५ लक्ष रुपये,धावडे – ५ लक्ष रुपये,रामी – ५ लक्ष रुपये,दलवाडे – ५ लक्ष रुपये,वरूळ – ५ लक्ष रुपये,इंदवे – ५ लक्ष रुपये ता.साक्री,उभंड – ५ लक्ष रुपये ता.साक्री,दुसाने – ५ लक्ष रुपये ता.साक्री,छावडी – ५ लक्ष रुपये ता.साक्री