आशा स्वयंसेविकांनी घेतली ‘मनसे’ कडे मदतीची धाव

28

🔸विविध मागण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष ‘अतुल वांदिले यांना दिले निवेदन

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.19जुन):- आशा स्वयं सेविका व गट प्रवर्टकाच्यां अद्यापही सोडवणूक न झाल्याने आशा स्वयं सेविकांनी मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या कडे घेतली मदतीची धाव व निवेदन दिले.आशा स्वयं सेविका व गट प्रवर्तकांचा विविध मागण्यासाठी राज्यव्यापी संप सुरू असून आशा स्वयं सेविकांच्या कामबंद आंदोलन जिल्ह्यात सुरू आहे यामुळे आज आशा स्वयं सेविका यांनी मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांची भेट घेऊन त्यांना विविध मांगण्याचे निवेदन देण्यात आले.

या निवेदनात विविध प्रकारच्या १५ मांगण्या आहेत शासनाने आशा व गट प्रवर्तकाना शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर्जा द्यावा, मानधनात वाढ करावी, आरोग्य विभागाचा नोकर भरती त आशा स्वयंसेविकांना प्राधान्य द्यावे, त्यांचे कामाचे तास कमी करण्यात यावी अशे अनेक मागण्या शासनाने मान्य करावा यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांना निवेदन देण्यात आले.
—————————————-