कोरपना तालुक्याच्या वतीने भाजपची नियोजन बैठक संपन्न

25

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

जिवती(दि.20जून):- भाजपा कार्यालय कोरपना येथे आज नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा अध्यक्ष तालुका कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे श्री बंडूजी मोहितकर सर योग गुरु,श्री अरुणजी मडावी सरपंच चेन्नई,श्री अमोल आसेकर नगरसेवक कोरपना,श्री ओम पवार युवा मोर्चा जिल्हा सचिव, श्री यशवंत पाटील इंगळे,श्री दिनेशजी खडसे युवा मोर्चा प्रामुख्याने उपस्थित होते श्री नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपली वैयक्तिक जिम्मेदारी समजून 21 जून योग दिन,23 जून श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृतिदिन,25 जुन काळा दिवस म्हणून पाळावा.

27 जून पंतप्रधानांची मनकी बात हे चार ही कार्यक्रम यशस्वीरीत्या जनतेसमोर पोचवावे प्रत्येक पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख,बुथ प्रमुख, कार्यकर्त्यांनी यशस्वीरित्या पार पडावे व झालेल्या कार्यक्रमाचे फोटो पाठवावे असे आव्हान केले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले बैठकीमध्ये कार्यक्रमाविषयी विविध विषयावर चर्चा करण्यात आली व कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली या कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य श्री कार्तिक गोन्डलावार,श्री पद्माकर दगडी,अभय डोहे,मनोज तुमराम यांनी केले कार्यक्रमाचे संचालन अमोल आसेकर यांनी केले तर आभार ओम पवार यांनी मानले