पेरणीसाठी पैसे नाहीत म्हणून आपल्या दोन्ही मुलाला अवताला जुंपले – मुखेड चा आबादी नगर तांडा वर मुलांना जुपून पेरणी

28

✒️विषेश प्रतिनिधी(शिवानंद पांचाळ नायगांवकर)

मुखेड(दि.20जून):- तालुक्यातील मधील तांडा चे नाव आबादी नगर. गावाच्या नावातच तेवढी श्रीमंती. जमीन पूर्णतः माळरान. खडकाळ म्हणावी एवढी वाईट. पेरले तर उगवणार किती याचे उत्तर कसे मिळतच नाही. पण आशा मोठी म्हणून सखुबाई माधव चव्हाण यांनी एकरभरापेक्षा कमी रानात आपली दोन्ही पोरं अक्षरशः जुंपली. अजय आणि विजयच्या मदतीने आता बियाणे पेरली आहे. पण त्यासाठी त्यांना करावी लागणारी कसरत ही अपार कष्टाची आणि मानहानीची. दारिद्र्यरेषेच्या रेशन कार्ड वरील पिवळा रंग लग्न झाल्यापासून चिकटलेल्या सखुबाई चे पती चार वर्षांपूर्वी वारले. त्यांच्या हयातीमध्ये ही पेरणीसाठी उधारी ठरलेलीच. यावर्षी सखु बाईंनी गावातील सख्या बहिणीकडून तीन हजार रुपये हात उसने घेतले. तिला बिचारीला पिक कर्ज वगैरे असे शब्दही माहीत नाहीत. पण पाऊस झाला आहे आणि सखुबाई रान पेरले आहे. किती उगवेल, काय उगवेल हे कुणालाच सांगता येत नाही.

गरीब परिस्थितीत मार्ग काढावा लागेलच असे मात्र त्या सांगतात.यावर्षी पिक कर्ज मिळण्याची शक्यता आस्था नाही मागणे पुरेशी नसल्याने काही जिल्ह्यात नवीन मागणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. पण शासकीय पातळीवरील निर्देश सखुबाई सारख्या पर्यंत पोहोचतच नाही. स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या अन्नधान्याचा शिवाय त्यांना कधीच कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ झाला नाही. सरपंच गणपत चव्हाण म्हणाले, या महिलेचा नवरा वारल्यानंतर निराधार योजनेत त्यांची फाईल केली होती. पण दोन वर्षे ती तशीच पडून आहे. त्यामुळे सरकारी योजना काही तांड्यावर पोहोचली नाही. नावातला आबादी उतरावा म्हणून आम्ही कागद पाठवतो पण पुढे काही घडत नाही. सखुबाई चा कष्टावर भरोसा आहे. एक एकरपेक्षा कमी शिवारात त्यांनी त्यांची दोन मुले जुंपली. तत्पूर्वी मुखेड ला जाऊन पाचशे रुपयांचे बियाणे आणले.

१८०० रुपयांची युरियाची पिशवी आणली अन् गावापर्यंत येताना आणि ऑटो रिक्षा वाल्याने पन्नास रुपये घेतले. उसनवारी ची रक्कम आता संपली आहे. आता पावसावर भरोसा. गेल्या वर्षी झालेल्या दीड ते दोन जोंधळयावर सारे चालले आहे. एक मुलगा दहावीपर्यंत शिकला तर दुसरा सातवी मध्ये आहे. एका मुली सातवी नंतर शाळेत पाठविणे सखूबाईने बंद केले तर आता मिळेल तिथे मजुरी करायची आणि जगायचे. करोणा मुळे आता मजुरी मिळणे अवघड झाले आहे. पण जगायचे असेल आणि पाऊस झाल्याने पेरावे तर लागेलच.

मुखेड मधील खडकाळ जमिनीतून पेरले लि ही आशा जिवंत राहील काय, हे मात्र पावसावर अवलंबून असेल. गेल्या काही वर्षात पेरणीयोग्य क्षेत्रात राज्यात घट झाल्याचीआकडेवारी आहे.
पेरणीला सुरुवात झाली आणि मुखेड मधील आबादी नगर तांड्यावर दोन मुलांना आईने कामाला जुंपले. पोटाची खळगी भरण्यासाठी च्या कष्ट करणारा शेतकरी सखूबाई.