पुणे महानगर पालिकेच्या उपमहापौर सुनिताताई वाडेकर यांचा रिपाईच्या वतीने सत्कार

    37

    ✒️दिनेश लोंढे(विशेष प्रतिनिधी)

    मुंबई(दि.20जून):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर यांच्या सुविद्य पत्नी सौ.सुनिताताई वाडेकर यांची पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौर पदी निवड झाल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र शाखेच्या वतीने पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान सत्कार करण्यात आला.

    ह्यापुढे रिपब्लिकन चळवळ गतिमान करणाऱ्या कार्यकर्त्यांना केंद्रीय मंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब मोक्याच्या जागा देतील तसेच रिपब्लिकन पक्षाच्या वतीने यथोचित सत्कार सन्मान करण्यात येईल.

    याप्रसंगी रिपाई महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष एडवोकेट आशाताई लांडगे, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर,नाशिक महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गुंफाताई भदरगे,पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांता ताई सोनकांबळे, युवा नेते प्रशांत गांगुर्डे, युवा नेते राजाभाऊ पाटील आदी उपस्थित होते.