खेरवाडी सेंट्रल रेल्वे ओव्हर ब्रिज कामासाठी व्यत्यय येणाऱ्या झाडांची कत्तल चालू

30

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.20जून):-निफाड तालुक्‍यातील खेरवाडी सेंट्रल रेल्वे ओव्हर ब्रिज चे काम सुरुवात झाली असून व्यत्यय येणारे चिंचेच्या झाडाची व इतर वृक्षांची कतली करण्यास सुरुवात झाली येथील सामाजिक कार्यकर्ते वृक्षप्रेमी विलास पाटील यांनी संवाद साधताना सांगितले की हे वृक्ष तोडले ले चिंचेचे झाड सुमारे शंभर सव्वाशे वर्षापूर्वीचे असून आमच्या वडीलधाऱ्या माणसाची ची नेहमी आठवण करून देणारे व गावातील घडामोडी बातचीत वाद सोडवणे राजकीय खलबत्ते विवाह जमविणे टवाळकी चर्चा मिरवणुकीला जास्त वेळ थांबा असणारे बालवयात चिंचेचा आस्वाद घेत असणारे अशा झाडांची कत्तल होत असताना त्यांनी खंत व्यक्त करत असताना खेरवाडी गावातील कुटुंबातील व्यक्ती हरवल्यासारखे असे वाटत आहे.

आज जगभरात कोरोना महा मारी ने थैमान घातले असून यासाठी प्राणवायूची आवश्यकता असते यासाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते व आपल्याला ऑक्सीजन कसे मिळवता येईल या साठी दर पावसाळ्यात प्रत्येक कुटुंबाने प्रत्येक व्यक्तीने घराजवळ एक तरी झाड लावावे व आगामी काळात येणाऱ्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करूनच वाढदिवस साजरा करण्याचा माणस केला आहे या वेळी वृक्षांचे काय महत्व असते याबद्दल पत्रकारांशी संवाद साधताना आपले मनोगत व्यक्त केले यावेळी यावेळी पत्रकार राजेंद्र आहेर पत्रकार विजय केदारे एडवोकेट संदीप पवार सामाजिक कार्यकर्ते गणेश आवारे .शैलेश शेलार. संजय बूब. बबन गोडसे व कार्यकर्ते उपस्थित होते