युवा इंटकच्या विदर्भ संघटक पदी अनिकेत अग्रवाल यांची निवड

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.21जून):– गेल्या अनेक वर्षांपासून तरुणांना हाताशी धरून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करीत काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या *अनिकेत* *अग्रवाल* यांची *युवा* *इंटकच्या* *विदर्भ* *संघटक* पदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती महाराष्ट्र इंटक प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश छाजेडजी यांनी केली व नियुक्तीचे पत्र विदर्भ महिला इंटकच्या अध्यक्षा सौ.अर्चनाताई भोमले यांच्या हस्ते देण्यात आले.

चंद्रपुरचे लोकप्रिय *खासदार* *बाळुभाऊ* *धानोरकर* यांनी *अनिकेत अग्रवाल* यांचे नियुक्ती झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी विजयभाऊ धोबे,हनिफभाई शेख हे उपस्थित होते.