कोरपना येथे श्रीकृष्ण सभागृहात भारतीय जनता पार्टीच्या वतीने जागतिक योग शिबिर

30

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

जिवती(दि.21जून):- विकास पुरुष माननीय आ श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार वित्त नियोजन वन तथा पालकमंत्री महाराष्ट्र राज्य,श्री हंसराजजी अहिर केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार,तसेच श्री देवरावभाऊ भोंगळे भाजपा जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर यांच्या सूचनेनुसार आज जागतिक योगा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे श्री बंडुजी मोहितकर सर योग गुरु,श्री किशोरजी बावने जिल्हा सहकार आघाडी प्रमुख, डॉक्टर भास्कर मुसळे, श्री दिवाकर मालेकर योग गुरु, श्री संजयभाऊ मुसळे माझी संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष, श्री रमेश पा मालेकर, श्री अमोल आसेकर नगरसेवक कोरपना, श्री ओम पवार युवा मोर्चा जिल्हा सचिव, अँड पवन मोहितकर,श्री बालु पाणघाटे आदी मान्यवर उपस्थित होते योग गुरु श्री बंडुजी मोहित्कर सर यांचा सत्कार श्री नारायण हिवरकर तालुकाध्यक्ष यांच्या हस्ते शाल श्रीफळ मानचिन्ह प्रशस्तीपत्रक देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते दिवाकर जी मालेकार योग गुरु यांचा सत्कार करण्यात आला.

श्री योग गुरु मोहितकर साऱ यांनी योगा बद्दल माहिती दिली व योगा शिकविण्यात आला श्री नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात योग हा ऋषीमुनी साधू संत यांच्या मार्गदर्शनाखाली फार पूर्वीपासून शिकविले जायचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला संयुक्त राष्ट्राच्या 193 देशांपैकी 175 देशाचे प्रतिनिधी या प्रस्तावाला पाठिंबा दिला म्हणून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांच्या प्रस्तावानुसार जागतिक योग दिन साजरा करण्यात येतो यामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा सिंहाचा वाटा आहे हा केवळ एक व्यायाम नसून शरीराला निरोगी ठेवण्याचा एक सोपा मार्ग आहे यामुळे हाडे, मांसपेशी,सांधे दणकट राहतात व मनुष्य निरोगी राहतो असे आपल्या मनोगतात बोलून दाखविले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन किशोरजी बावणे यांनी केले तर आभार श्री ओम पवार युवा मोर्चा जिल्हा महासचिव यांनी मानले