उंब्रज पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी

29

✒️दिनेश लोंढे(विशेष प्रतिनिधी)

उंब्रज(दि.२१जून) :- उंब्रज पोलीस स्टेशन चे पोलीस अंमलदार PC वैभव यादव हे चाफळ भागात पेट्रोलींग करत असताना रोडवर त्यांना एम.आय.नोटचा नाईट प्रो. मोबाईल सापडला त्यांनी सदर मोबाईलवरून सदर मोबाईल मालकाचा शोध घेऊन व त्यांचाच असल्याचा खात्री करुन तुषार रघुनाथ जाधव राहणार हेळगाव तालुका कराड यांना त्यांचा मोबाईल परत केला आहे.

पोलीसांनी तत्परतेने मदत केले बदल त्यांनी पोलीसांचे कामगिरी बद्दल समाधान व्यक्त केले आहे.पोलीस अंमलदार वैभव यादव यांचे वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे.