गोपा येथे योग दिनानिमित्त कार्यक्रम

28

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.21जून):-तालुक्यातील गोपा येथे 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने कै. दाजीबा होळकर सेवाभावी संस्था गोपा ता. गंगाखेड आणि महाएनजिओ फेडरेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये एकाच वेळी 100 ठिकाणी जागतिक योग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी संचालक नामदेव बापुराव होरगुळे, योगशिक्षका लक्ष्मी खरात,वैश्वानरदेव पवार , बालासाहेब कोरके आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी गावातील स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.