शुद्ध पाणी पुरवठा करा अन्यथा पाण्याची टाकी वर चढून आंदोलन करू :  शिवसेना दोंडाईचा शहर महिला आघाडीचा इशारा

29

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)

दोंडाईचा(दि.21जून):-दोंडाईचा शहरात गेल्या एक महिन्यापासून नगरपालिका गाळ युक्त जंतूसहित दूषित पाणीपुरवठा होतो आहे. याची तात्काळ चौकशी करून दोंडाईचा शहरवासीयांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी दोंडाईचा शिवसेना युवासेने, महिला आघाडी तर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात दोंडाईचा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की दोंडाईच्या शहरात गेल्या एक महिन्यापासून नगरपालिकेच्या सर्व नळांना गाळयुक्त व जंतू सहित दूषित पाणीपुरवठा होत नाही.

त्याकडे नगरपालिका दुर्लक्ष केले असून जनतेच्या मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दूषित पाण्यामुळे साथीच्या रोगाच्या छातीच्या रोगाच्या प्रादुर्भाव वाढला असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे शुद्ध पाणी मिळत नसल्याने लोकांना घशाच्या त्रास होणे सुरू झाले आहे. आधीच कोरोनाच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. दूषित पाण्यामुळे कोरोनाचा व छातीचे रोग वाढण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे सध्यस्थितीत होत असलेल्या दूषित पाणी पुरवठ्याची चौकशी करून तात्काळ शुद्ध पाण्याच्या पुरवठा करावा, असे नमूद केले आहे.

नळाद्वारे होणाऱ्या दूषित पाणी पुढची चौकशी करून तात्काळ शुद्ध पाणीपुरवठा करावा असा इशारा शिवसेना चे युवा सेनेचे तालुका प्रमुख आकाश कोळी, शहर प्रमुख सागर पवार, शिवसेनेचे उपशहरप्रमुख विजय वाडीले, चुडामन बोरसे, राज ढोले, चेतन साबळे, आबा चित्ते, निलेश विसावे, आणि सुनंदा पवार,विजया मराठे,लक्ष्मी ठाकूर, प्रीती वाल्हे, माधुरीताई, कविता जाधव, कमलबाई आदी उपस्थित होते.