आता पुरोगामी पत्रकार संघ भूमीहिंनासाठी मैदानात….

26

🔹भूमिहीन सन्मान योजना सुरू करा- तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना दिले निवेदन

✒️नवनाथ पौळ(केज प्रतिनिधी)

केज(दि.21जून):-भारत देश हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो.देशासह राज्यातील 70% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. आणि त्या शेतीवरच लाखो भूमिहीन शेतमजूर आणि कामगारांची उपजीविका चालत असते.सततची नापिकी,दुष्काळ आणि अवर्षमान यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. आणि त्याच शेतीवर आणि शेतीशी संबंधित कामावर मोलमजुरी करून आपली व आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत असतात.शेतीवर मोलमजुरी करून उपजीविका भागवणार्या भूमिहीन लाखो शेती कामगारांना रोजगार मिळत नसल्यामुळे काही अर्धपोटी तर काही उपाशीपोटी जगत आहेत.

शेतकऱ्यांना केंद्र सरकारने शेतकरी सन्मान योजना सुरू शेतकरी वर्गास दिलासा दिला आहे,परंतु त्याच शेतीवर आधारीत आपली उपजीविका भागवणारऱ्या भूमिहीन शेतमजुरांच काय ,त्यांच्यासाठी काय उपाययोजना आहेत का? म्हणून शेतमजूर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी भूमिहीन सन्मान योजना सुरू करावी आणि कोरोना महामारीच्या काळात या मजुरांना आधार म्हणून प्रत्येकी दहा हजार रुपये अनुदान द्यावे,अशा मागणीचे निवेदन दत्तात्रय मुजमुले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने यांनी 21 जून रोजी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केज तहसील कार्यालय मार्फत दिले आहे.

या निवेदनावर पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा उपाध्यक्ष मा.स. का पाटेकर सर, केज तालुका सचिव रणजित घाडगे,बीड जिल्हा सचिव राजकुमार धिवार, केज तालुका कार्याध्यक्ष नवनाथ पौळ ,सचिन बचुटे, बाळासाहेब खाडे,बाळासाहेब जाधव ,सोनबा राऊत अशोक बोबडे आदींच्या स्वाक्षरी आहेत.