उंब्रज पोलीस टिमची कारवाई- तडीपार गुन्हेगारास अटक

32

✒️दिनेश लोंढे(विशेष प्रतिनिधी)

कराड(दि.२२जून):- उंब्रज पोलीस स्टेशनला मारामारी व गंभीर दुखापत, सरकारी कामात अडथळा इत्यादी गंभीर गुन्हे दाखल असणारा व रेकाॅर्डवरील गुन्हेगार तसेच तीन जिल्हे सातारा,सांगली, कोल्हापूर मधुन तडीपार असलेला गुन्हेगार नामे-सुमित दिपक शिंदे वय २५ वर्ष रा.कालगाव ता कराड हा विनापरवानगी उंब्रज भागात आल्यांची गोपनिय माहिती सपोनि अजय गोरड यांना मिळाली होती त्यांनी तात्काळ टिम पाठवुन सदर गुन्हेगारास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.सदरची कामगिरी पोलीस अंमलदार दत्ता लवटे,प्रविण फडतरे,होमगार्ड अभिजीत पाटील,व स्वप्निल मोरे यांनी केली आहे.

सर्व नागरिकांना उंब्रज पोलीस स्टेशन वतीने जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, उंब्रज पोलीस स्टेशन रेकाॅर्डवरील तडीपार गुन्हेगार उंब्रज भागात व सातारा जिल्हात दिसुन आल्यास व त्यांनी काही भांडण -तंटा,दहशत केल्यास तात्काळ आमचा मोबाईन नंबर ९६२३९६१०००यावर संपर्क करण्याचे आवाहन सपोनि अजय गोरड यांनी केले आहे.