सहा हजार रुपये परत करून विलास मेश्राम यांनी दाखविला प्रामाणिकपणा

34

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.22जुन):-ब्रह्मपुरी तालुक्यातील कहाली येथील गणेश डांगे यांनी ७मे रोजी गुगल पे चा वापर करत एस बी आय बँक खात्यातील ६ हजार रुपयांची रक्कम दुसऱ्याच्या खात्यात जमा करीत असताना अचानक नकळत रन मोचन येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते विलास मेश्राम यांच्या खात्यात जमा झाल्याने त्याने कसलाही विचार न करता माणुसकीचा परिचय देताना ईमानदारी जोपासत त्यांच्या खात्यात जमा झालेली ६ हजार रुपयाची रक्कम गणेश डांगे यांना परत करीत प्रामाणिक पणा दाखवला आहे.

सविस्तर प्राप्त माहिती अशी की गणेश डांगे यांनी गुगल पे द्वारे एसबीआय बँकेच्या खात्यातून सदर रक्कम दुसऱ्याला टाकली मात्र त्यांच्या मोबाईलवर मॅसेज न आल्यामुळे ते बुचकळ्यात पडले आणि ताबडतोब गुगल पे कस्टमर केअर शी संपर्क साधला मात्र त्यांनी तुमचे पैसे कुठे गेले नाही? ते जमा होतील अशी माहिती दिली परंतु एवढी मोठी यंत्रणा असताना सुद्धा असा कारभार होतोच कसा असा आरोप गणेश डांगे यांनी केला आहे अखेर काही दिवसांनी सदर ६ हजार रुपये असलेली बँक खात्यातील रक्कम रणमोचन येथील विलास मेश्राम यांच्या खात्यात जमा झालेअसल्याचे कळताच गणेश डांगे यांनी भ्रमणध्वनीवरून विलास मेश्राम यांच्याशी संपर्क केला.

ही बाब विलास मेश्राम यांच्या लक्षात आली व त्यांनी माणुसकीचा परिचय देत गणेश डांगे यांचे सहा हजार रुपये इमाने इतबारे कोणताही खर्च न घेता वापस केले
प्रतिक्रिया: मोबाईल मुळे तंत्रज्ञान वाढला असला तरी सदर ऐ्य्प्स व कस्टमर केअर च्या ठीसाळ व गलथान कारभारामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे कोणताही व्यवहार करताना ग्राहकांनाही सावधानता बाळगावी
गणेश डांगे कहाली (ब्रह्मपुरी)