शिवारातील शेतकऱ्यांचा महावितरणाच्या भोंगळ कारभारवर रोष

27

🔸वादळी वाऱ्यातून ७ ते ८ विद्युत पोल जमीनदोस्त-त्वरीत पोल उभे करा अन्यथाशिवसेना आंदोलन करणार

✒️प्रतिनिधी धुळे(जयदिप लौखे-मराठे)

बळसाणे(दि.22जून):- म्हसाळेसह परिसरात गेल्या पंधरवड्यात वादळी वारा व विजेच्या कडकडटासह पावसाने हजेरी लावली मान्सून पुर्व झालेल्या अवकाळी पावसाने महावितरणच्या भोंगळ कारभाराचे जणू पितळच उघडे पाडले महावितरण कडून मान्सून पुर्व कामे करण्यासाठी जलद तयार व्हायला पाहिजे होती. परंतु पावसाळा तोंडावर आल्यावर वीजवितरण कंपनी ला जाग येत आहे वीज ग्राहकांकडून लाखो रुपयांची विज बील वसूल करुन ही वीज शेतकऱ्यांना काळोख्या ची अन् उकाड्याची रात्र शेतात काढावी लागल्याची नारजगी होत आहे.

गेला काही दिवसांपासून जीव धाईकुतीला येईल असा उकाडा जाणवत होता त्यात म्हसाळे शिवारात जोराचा वारा सुटून वातावरणात बदल झाला दरम्यान रात्री च्या पहिल्या सत्रात तसेच थोडी विश्रांती घेत पुन्हा मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली त्यात वीजेचा कडकडाट आणि वारा ही होता वादळी वाऱ्याने वीज तारा तुटून वीज पोल साधारणतः ७ ते ८ उन्मळून जमीनीवर आढळले दरम्यान वीजपुरवठा खंडित झाला. वीज पुरवठात बिघाड होऊ नये म्हणून महावितरणकडून ढगाळ वातावरण झाले की लगेचच विजपुरवठा बंद केला जातो. त्याचप्रमाणे महावितरणाने वीजपुरवठा बंद ही करण्यात आला त्यानंतर वातावरण शांत असताना पाण्याची रिमझिम सुरू होती जवळपास अर्धा एक तास रिमझिम पाऊस सुरूच होते.

अशावेळीही वीजपुरवठा खंडित केला तद्नंतर वीज बंद च राहिला अनेक वीज ग्राहकांनी महावितरणाशी संपर्क साधला असता ग्राहकांना प्रतिसाद मिळाला नसल्याने हजारो ग्राहकांना उकाड्याने आणि डासांच्या त्रासाने रात्र जागून काढावी लागली.
शिवसेनेचे महावीर जैन यांच्याशी म्हसाळे गावातील शेतकऱ्यांनी संपर्क साधत महावितरणाच्या भोंगळ कारभार बद्दल संताप व्यक्त केला. सांगा महावीर भाऊ कोरोना ने आमचे वाटोळे केले परत आम्ही आमच्या हिंमतीने आमच्या काळ्या मातीशी खेळत असताना वरुणराजा कसा बसा आला त्याच्या भरोशावर शेतीची मशागती केली आणि वादळामुळे आपल्या शिवरातील वीजपोल कोसळले या गोष्टी विचार ही नव्हता शेवटी आमच्या विहिरीतले शिल्लक असलेल्या पाणी घालून आमच्या पिकांना जीवदान देऊ असे व्याकुळतेने शेतकऱ्यांनी जैन यांना सांगितले.

याबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा तक्रारी करून ही आमच्या तक्रारी वर अधिकारी च काय लाईनमन ही लक्ष घालीत नसल्याची नाराजगी दर्शवली यांच्या हलगर्जीपणा मुळे कांदे , मिरची , कपास व भाजीपालासह अनेक पिक जळण्याच्या मार्गावर आहेत गेल्या दोन वर्षापासून परिसराचा शेतकरी मेटाकुटीला गेला आहे. महावितरणाने त्वरित विजपुरवठा सुरु करावा अन्यथा शिवसैनिक शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना उपतालुका प्रमुख महावीर जैन यांनी दिला आहे.यावेळी विभागप्रमुख वना जाधव,सजन माळी, योगेश निकुंभे,अनिल शिरसाठ,योगेश पारधी,प्रशांत माळी,चेतन राजपूत,जगदीश शिंदे,एकनाथ सोनवणे,योगेश भागवत आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.