आमदार समिर कुणावार यांनी ग्रामीण रस्ते विकासात घेतली धडाडी

36

🔸१५ कोटि ५८ लाख रुपये निधितुन उभारणार रस्त्याचे जाळे

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.२३जून):-हिंगणघाट-समुद्रपुर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार समिर कुणावार यांचे शुभहस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत हिंगणघाट तसेच समुद्रपुर तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करीत विकासकामांची मुहुर्तमेढ़ रोवली.सदर भूमिपूजन करण्यात आलेले रस्ते एकूण १५ कोटि ५८ लक्ष,९४ हजार रुपये अनुदानातुन बांधण्यात येणार असून या रस्त्याचे तात्काळ कामे सुरु होणार आहेत.

हिंगणघाट येथीलच नव्हे तर विदर्भातील श्रद्धाळूच्या श्रद्धास्थानी असलेल्या शहालंगड़ी येथील नागाबाबा देवस्थानापासून राष्ट्रीय महामार्गाला जोड़णाऱ्या रस्त्याची दर्शनार्थी तसेच देवस्थानाच्या वतीने मागणी करण्यात आली होती, आमदार कुणावार यांनी दखल घेतल्याने आज या रस्त्याचेही भूमिपूजन करण्यात आले यावेळी श्रद्धेय वासुदेव महाराज हे प्रामुख्याने उपस्थित होते .
सदर रस्त्याची विकासकामे करण्याची ग्रामीण भागातील जनतेची मोठी मागणी होती.

मतदारसंघातील नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन आमदार समिर कुणावार यांनी हिंगणघाट तालुक्यातील डोरला,शहालंगड़ी देवस्थान,सुलतानपुर ते उमरी रस्त्याचे भूमिपूजन केले तर समुद्रपुर तालुक्यातील मांगली ते उबदा,सावरखेड़ा ते हिवरा,महागाव ते वायगाव(गोंड) तसेच रामनगर ते परसोड़ी इत्यादि रस्त्याचे भूमिपूजन केले.

याप्रसंगी जिल्हा परिषद पशुसंवर्धन सभापती माधव चंदनखेडे,जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती मृणालताई माटे,भाजपा महामंत्री किशोर दिघे,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष नितीन मडावी,पंचायत समिति सभापती सौ.शारदा आंबटकर,समुद्रपुर प.स.च्या सभापती सौ.सुरेखा टिपले,जिल्हा परिषद सदस्य शरद भाऊ सहारे, हिंगणघाट भाजपाध्यक्ष आशिष भाऊ पर्बत, पंचायत समिती माजी सभापती गंगाधरराव कोल्हे, समुद्रपूर पंचायत समिती उपसभापती योगेश भाऊ फुसे, हिंगणघाट भाजपा तालुका अध्यक्ष आकाश पोहाणे, समुद्रपूर भाजपा तालुका अध्यक्ष संजय डेहणे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव आंबटकर, विनोद विटाळे , तुषार आंबटकर, भाग्येश देशमुख, बालुभाऊ इंगोले, कैलास टीपले , नितीन भोयर, वायगाव गोंड येथील सरपंच रोशन पांगुळ, कंत्राटदार राजाभाऊ मॅडमवार, अभय मॅडमवार इत्यादी मान्यवर मंडळी सदर कार्यक्रमास उपस्थित होती.