✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)

बीड(दि.23जून):-जालना रोडवर जेवले शहरा जवळील जमादार इन पुलावर सोमवारी रात्री नऊ वाजता स्मार्ट गेवराई कडून सागर कडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला समोरून येणाऱ्या चारचाकी स्कार्पिओ या गाडीने जोराची धडक दिली यामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे.

गेवराई शहरातून शहागड कडे निघालेली दुचाकी क्रमांक एम एच 21 बिडी 13 44 समोरून भरधाव येणाऱ्या स्कार्पिओ चार चाकी गाडी समोरासमोर धडक दिली यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून व्यक्तीला आजूबाजूच्या नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात गेवराई येथे दाखल केले असून जखमेवर उपचार सुरू असल्याची माहिती थेट डॉक्टर यांनी दिले आहे

बीड, महाराष्ट्र
©️ALL RIGHT RESERVED