छत्रपती शिवराय शिवराज्याभिषेक दिन साजरा

24

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.23जून):-छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्यभिषेक दिन 23 जून हा तिथीनुसार साजरा केला जातो.भावसार युवा एकता महिला आघाडी चंद्रपूरच्या वतीने शिवराज्याभिषेक,हिंदू साम्राज्य दिन म्हणून साजरा केला
कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष योगिता धनेवार, प्रमुख मार्गदर्शक अभिलाषा मैंदळकर,मीनाक्षी अलोने, वैशाली जोगी,अर्चना अलोने,पुष्पा दखणे, पत्रीवार, छाया बरडे, कमल अलोने, प्रीती लाखदिवे, वैशाली भागवत आदी उपस्थित होते.
मार्गदर्शनात अभिलाषा मैंदळकर म्हणाल्या,हे हिंदवी स्वराज्य उभे राहावे ही तर श्रीची ईच्छा.आई भवानीच्या कृपा प्रसादाने हिंदवी स्वराज्य ही त्यांची दृढ ईच्छा होती.

महाराजांनी राज्याभिषेक केला स्वतःला महाराज म्हणविण्यासाठी नाही तर जगातल्या सगळ्या लोकांना कळावे की हिंदू राजा होऊ शकतो,म्हणून हा देश कुणाचा या देशात परकीय कोण ? स्वकीय कोण यासाठी.अश्या प्रसंगी अनुशासन,समरसता,संघटन हे सर्व हिंदू समाजात रुजविण्यासाठी सगुण साकार व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यतिरिक्त दुसरे कुठले असणार त्यांनी इंग्रज,फ्रेंच,पोर्तुगीजांचे साम्राज्य वाढू न देता मर्यादेत ठेवले महाराजने स्वतःचे राजेपन कधीही मिरविले नाही तर स्वराज्यासाठी एकही दिवस विश्रांती न घेता,राज वैभवात रममाण न होता महाराजांनी अखंड”रात्र न दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग”या पद्धतीने रानोमाळ भटकंती करत स्वराज्याचे स्वप्न साकार केले.

पूज्य डॉक्टर हेडगेवार यांच्या मनात हिंदू संघटनेची कल्पना येत असतांना महाराजांचा इतिहास डोळ्या समोर होता महाराजांकडून प्रेरणा मिळाली त्यांनी भगव्या ध्वजाला स्वराज्याचे ध्वज म्हणून प्रस्थापित केले.तानाजी मालुसरे,नेताजी पालकर,बाजी प्रभू,प्रतापराव,मुरारबाजी ही सारी मंडळी अतुलनीय पराक्रम गाजवून इतिहासात अजरामर झाले.23 जून या तारखेला देशभरात छत्रपती शिवराय शिवराज्यभिषेक दिन हिंदू समाजाला प्रेरणा देणारा दिवस हा हिंदू साम्राज्य दिन म्हणून साजरा केला जातो.आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.