महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या माध्यमातून ‘मदत व सल्ला’ केंद्राचे खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते उदघाटन

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.24जून):- महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या माध्यमातून आज जिल्हा सामान्य रुग्णालयात मदत व सल्ला केंद्र सुरू करण्यात आले याचे उद्घाटन चंद्रपूर वणी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांनी केले. महिला काँग्रेस च्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या नेतृत्वात आणि महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्षा चित्रा डांगे यांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू झाला असून दर गुरुवारी महिला काँग्रेस चे पदाधिकारी जिल्हा सामान्य रुगणालायतील या केंद्रा वर दर गुरुवारी दुपारी १२ ते २ या वेळेला उपस्थित राहून सामान्य रुग्णालयात नागरिकांना ज्या अडचणी येतात त्या सोडवण्याचा प्रयत्न या केंद्राच्या माध्यमातून करणार आहे.

खासदार बाळू धानोरकर यांनी लाल फित कापून या केंद्राचे उदघाटन केले या वेळी त्यांनी महिलांच्या या उपक्रमाला शुभेच्छा देऊन सर्व महिलांचे अभिनंदन केले व या केंद्राच्या माध्यमातून रुग्णालयातील सर्व समस्या खासदार या नात्याने मी सोडवण्याचा प्रयत्न करणार सोबतच पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या माध्यमातून देखील हे रुग्णालय सर्व सोयीयुक्त करण्यात येईल असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी या वेळी केले

या केंद्राच्या माध्यमातून आरोग्य विषयक शासकीय योजनांची माहिती महिला काँग्रेस रुगणालायतील लोकांना देणार आहे व येणाऱ्या सर्व अडचणी पालकमंत्री विजय वडेट्टीवार व खासदार बाळू धानोरकर यांच्या माध्यमातून सोडवून शासकीय रुगणालायतल येणाऱ्या सर्व लोकांना उत्तम सोयी मिळाव्या यासाठी प्रयत्न करणार असे प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी या उपक्रमा बद्दल माहिती देतांना सांगितलं. या कार्यक्रमला प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर, जिल्हाध्यक्षा चित्रा ताई डांगे, अल्पसंख्याक चे जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, अनुसूचित सेल च्या महिला शहर अध्यक्षा शालिनी भगत, समाजसेवक मतीन कुरेशी, हाजी अली, उपाध्यक्षा सुनीता धोटे, ब्लॉक अध्यक्षा शीतल काटकर, उपाध्यक्षा स्वाती त्रिवेदी,उपाध्यक्षा हर्षा चांदेकर, सदस्य लता बारापात्रे, मुन्नी मुमताज शेख, चंदा वैरागडे, शाहीन खान, वंदना खेडकर, बबलू कुरेशी यांची उपस्थिती होती.