मराठा आरक्षणासाठी आ.धस काढणार मोर्चा

25

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.24जून):-मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा हलगर्जीपणा आहे.आता राज्याने विनंती याचिका केली आहे.त्यात योग्य माहिती द्यावी,पाठपुरावा करावा यासाठी सोमवार (दि. २८) रोजी मोर्चा काढणार असल्याची घोषणा आ.सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत केली.सोमवारी निघणारा हा मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा राहणार आहे.यात मराठा आरक्षणासोबतच पिक कर्ज तातडीने वाटप व्हावे.पिक विम्याच्या बाबतीत बीड पँटर्न उलटा चाललाय,यात दोषींवर कारवाई करुन पिक विमा मिळवून द्यावा.

उसतोड मजुर,मुकादम यांच्यासाठी कायदा करावा,६६% भाववाढ द्यावी.कोविडच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी पात्र कर्मचाऱ्यांना आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या भरतीत थेट नियुक्ती द्यावी अशा मागण्या केल्या जाणार आहेत असे आ. सुरेश धस म्हणाले.आरोग्य विभागाच्या भरतीत नवे लोक घेण्यामध्ये काही तरी गौडबंगाल आहे,आणि यात आरोग्यमंत्र्यांचा हेतु दूषित आहे असेही आ.सुरेश धस म्हणाले.