अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने उदगीर च्या शिवाजी चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन संपन्न

30

✒️विषेश प्रतिनिधी(शिवानंद पांचाळ नायगांवकर)मो:-९९६०७४८६८२

उदगीर-लातूर(दि.२४जुन):- स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसीचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे आज अखिल भारतीय समता फुले परिषदेच्या वतीने उदगीरच्या शिवाजी चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आले स्वराज्य संस्था मधील आरक्षण प्रवर्तक ठेवून सकल ओबीसी समाजाला राज्य सरकार व केंद्र सरकारने न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनामध्ये समता परिषदेचे समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बालाजी फुले संचालक महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ तथा चेअरमन खरेदी-विक्री संघाचे भरत भाऊ चांगले भारतीय प्रदेश सचिव ओबीसीचे धर्मपाल नादर्गे पंचायत समितीचे माजी सभापती ईश्वराची खटके पंचायत समितीचे माजी उपसभापती ज्ञानोबाची गोडभरले जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेसचे विनोद सुडे आझर भाई शेख बापूराव बिरादार पत्रकार महेश मठपती प्राध्यापक सतीश क्षीरसागर महिला दैनिक यकजुटचे संपादक भगवान सगर रामकिशन नादर्गे धनाजी मुळे चंदू मुस्कावाड शिकापुर चेअरमन बाळासाहेब नवाडे कुमठा येथील सुनील केंद्रे बारा बलुतेदार संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर दापकेकर सदस्य बालाजी सुवर्णकार युवराज कांडगिरे या आंदोलनात तालुक्यातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आंदोलन प्रसंगी बालाजी सुवर्णकार सुनील जी केंद्रे बालाजी फुले डॉक्टर शरद तेलगाने भारत भाऊ चांबले बालाजी फुले धर्मपाल नादर्गे यांच्या सह इतर उपस्थित मान्यवरांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण व सुप्रीम कोर्टाने पूर्ववत चालू ठेवण्या बाबत विषाई आपले मनोगत व्यक्त केले हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी ओ बी सी चे सर्व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला या रस्ता रोको आंदोलन प्रसंगी शिवाजी चौक उदगीर येथे पोलीस प्रशांत प्रशासनाने खूप मोठे सहकार्य केले होते या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बालाजी सुवर्णकार यांनी केले