राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे धरणे आंदोलन- मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना तहसीलदार मार्फत दिले निवेदन

  42

  ✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

  चिमूर(दि.24जून):-देशातील ओबीसी समाजाचा विकास,उन्नती व्हावी यासाठी व राजकीय क्षेत्रात ओबीसींचे आरक्षण रद्द केल्याने आरक्षण पूर्वरत ठेवणे व इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ संघर्ष करीत असून केंद्र व राज्य शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने रास्त मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्यभर धरणे आंदोलनाच्या माध्यमातून चिमूर तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

  राष्ट्रीय ओबीसी महासंघ चे राष्ट्रीय समन्वयक प्राचार्य डॉ अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिमूर तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका चिमूर चे वतीने धरणे आंदोलन करण्यात आले असता मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले निवेदनातील मागण्या सविस्तर अश्या ओबीसी समाजाची 2021 मध्ये होऊ घातलेली जातीनिहाय जनगणना केंद्र सरकार करीत नसेल तर राज्य शासनाने जातीनिहाय जनगणना करावी.

  ओबीसी समाजाच्या सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेले स्थानिक स्वराज्य संस्था मधील राजकीय आरक्षण पूर्वरत सुरू करण्याकरिता समर्पित आयोगाची नियुक्ती करून गोळा करून माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर करून ओबीसींचे आरक्षण सुरू करावे, मराठा समाजाचा ओबीसी सवर्गात समावेश करू नये, राज्य शासनाने एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षा त्वरित घ्याव्या, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नंदुरबार, धुळे, ठाणे, नाशिक व रायगड पालघर जिल्ह्यात आरक्षण 19 टक्के देण्यात यावे.

  100 टक्के बिंदू नामावली केंद्र सरकारच्या दि 2 जुलै 1997 व 31 जानेवारी 19 च्या मार्गदर्शक सूचना सूचनानुसार त्वरित सुधारित करावी , राज्यात प्राध्यापक आरक्षण कायदा 2019 लागू करण्यात यावा, मेघा नौकर भरती सुरू करावी, 22 आगस्ट19 ची बिंदूनामावली स्थगिती उठवावी, म्हाडा घरकुल योजनेत ओबीसींना आरक्षण द्यावे, ओबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांना विदेशी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजणेस पात्र ठरविण्याकरीता लावण्यात आलेली 8 लाख रुपये उत्पन्न मर्यादा रद्द करून नॉन क्रिमिलयर प्रमानपत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना पात्र ठरविण्यात यावे , गुणवंत मुलामुलींना विदेशात उच्च शिक्षणासाठी देण्यात येणारी 10 विद्यार्थी वाढवून 100 विद्यार्थ्यांची करावी.

  ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना स्वंतत्र वसतिगृह सुरू करावे, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजनेत ओबीसी विद्यार्थ्यांना लागू करावी, शासन सेवा सरळ भरतीत 2014 ते 2018 या काळात समांतर आरक्षण पद्धतीमुळे ओबीसी विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय दूर करून अन्याय ग्रस्त विद्यार्थ्यांना न्याय देऊन नियुक्ती करावी, महाज्योती संस्थेतील एक हजार कोटींची तरतूद करण्यात यावी, ओबीसी आर्थिक महामंडळ ला एक हजार रुपयांची तरतूद करून महामंडळाच्या सर्व योजना सुरू करण्यात याव्या, शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळात एक हजार कोटी तरतूद करून सर्व योजना सुरू कराव्या, ओबीसी समाजाचा रिक्त पद अनुशेष त्वरित भरण्यात यावा,ओबीसी समाजाला घरकुल देण्यात यावे ,ओबीसी शेतकरी शेतमजूर यांना वयाच्या 60 व्या वर्षा पर्यत पेशन योजना लागू करण्यात यावी, बारा बलुतेदाराच्या आर्थिक विकासासाठी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या नावाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ ची स्थापना करून आर्थिक तरतूद करण्यात यावी, एससी एसटी प्रमाणे ओबीसी शेतकऱ्यांना 100 टक्के सवलतीच्या योजना सुरू कराव्या व अभ्यासक्रमात शंभर टक्के शिष्यवृत्ती द्यावी, धनगर समाजाची एक हजार कोटींची मंजूर योजना अंमलबजावणी साठी निधी तरतूद करावी, महात्मा फुले समग्र वागम्य 10 रुपये किमतीत द्यावा.

  ओबीसी ना शहर व तालुक्यात स्वंतत्र वाचनालय सुरू करावे, राज्यातील सर्व जिल्ह्यात ओबीसी कार्यालय सुरू करावी, अभिमत विद्यापीठ मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना लागू करावी, खाजगी उद्योग धंदे व उपक्रमात ओबीसी सवर्गासाठी आरक्षण लागू करावे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणीत ओबीसी चा समावेश करावा,लोकभाषा विद्यापीठाची राज्यात स्थापना करण्यात यावी या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे शिष्टमंडळाने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन देण्यात आले .

  दरम्यान जीप सदस्य गट नेते डॉ सतीश वारजुकर,नरेंद्र बंडे,विलास डांगे,अरुण लोहकरे ईश्वर डुकरे विजय डाबरे कवडू लोहकरे पस सदस्य भावना बावनकर प्रा राम राऊत व गजानन अगडे यांनी आपल्या भावना व्यक्त करीत ओबीसी समाज एकजूट होणे गरजेचे असल्याचे सांगत ओबीसींना न्याय मिळविण्यासाठी संघर्ष करण्याचे सांगितले.धरणे आंदोलनाचे अध्यक्ष गजाननजी अगडे होते. प्रास्ताविक रामदास कामडी ,संचालन एम जी मानकर तर आभार यांनी व्यक्त केले.

  धरणे आंदोलनात जील्हा परिषद सदस्य गट नेते डॉ सतीश वारजुकर,प्रकाश झाडे, ईश्वर डुकरे, अरुण लोहकरे, राजू लोणारे, नरेंद्र बंडे, संजय डोंगरे ,विलास डांगे पस सदस्य प्रदीप कामडी, प्रा राम राऊत, प्रा संजय पिठाडे,अविनाश अगडे, गजानन अगडे, विजय डाबरे, कवडू लोहकरे, एम जी मानकर, ओमप्रकाश गणोरकर, अनिल डगवार, यशवंत लोथे, मनोज कामडी, रंजित चांदेकर, प्रा पितांबर पिसे, राजकुमार माथनकर, भास्कर बावनकर, रामभाऊ खडसंग, जीप सदस्य ममता डुकरे, पस सदस्य भावना बावनकर, वर्षा शेंडे ,सौ पुष्पा हरणे, सौ उषा हिवरकर ,कु कोमल वंजारी, कु ममता वंजारी, धर्मदास पानसे, राजू बोडणे, राजेंद्र मोहितकर आदी उपस्थित होते.