परिवर्तनचा वसा

31

✒️लेखक:-संदीप गायकवाड(९६३७३५७४००)

आंभाळात काळे काळे ढग जमा झाले होते.वाऱ्याची मंजूळ झुळूक लवणाला आल्हादायक वाटत होती.एकादी मोठी वावटळ येऊन होत्यांच नव्हतं करते काय हा प्रश्न प्रदीपच्या मनाला सतावत होता.देशातील घडणाऱ्या अन्यायकारी घटनेने तो अस्वस्थ झाला होता.मनामनात क्रांतीचे स्पंदन चेतत होते.दाहीदिशा काळवडून गेल्या होत्या . देश अंधकारमय आभासी युगात भरकडत होता.नव्या क्रांतीजाणिवाचा प्रस्फोट मनात खदखदत होता.

प्रदीपने मनातील मरगळतेला झटकून नव्या क्रांतीसाठी स्वतःला तयार केले.जीवनातील आलेल्या दुःखाला गोजरत राहण्यापेक्षा त्यावर क्रियान्वयन करून मार्ग काढावा.समोर असलेल्या आदर्शाच्या महाऊर्जावान सम्यक तेजःपुंजाने नवी लढण्याची उर्मी निर्माण झाली होती.शिक्षण घेतानी समाजपरिवर्तनाच्या चळवळीतून अन्यायकारी व्यवस्थेवर आसूड ओढले होते.तो आता नव्या क्रांतीसाठी मित्रांना आंदोलनासाठी तयार करत होता.
डॉ.बाबासाहेबाचा विचार पुतळ्यात बंदिस्त होणारा नसून जीवंत माणसाच्या हृदयातील रोमारोमात तो संचारीत असतो.किती कटकारस्थान केले तरी बाबासाहेबांचा न्यायाचा मार्ग आम्ही सोडणार नाही असे अभिवचन त्यांनी मित्रांना दिले.आंबेडकरी समाजातील काही मतलबी मोरक्यांना जाळ्यात ओढून आपल्या असहिष्णूतेच्या विचाराची पेरणी त्याच्या मेंदूत करतात.जातीव्यवस्थेला खतपाणी देतात ,डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करायला भाग पाडतात.बहुजनाच्या धार्मिक कट्टरवादाचा उपयोग करून स्वतःचा राजकिय व सामाजिक स्वार्थ सादतात.या चमच्यापासून आपण सावध राहावे असा मंत्र तो मित्रांना देतो.

आंबेडकरी तरूणांने आपली लढाई नव्या ज्ञान तंत्रज्ञानाने लढावी.डिजीटल क्रांतीचा उपयोग करून भारताला नवचेतना द्यावी.आंबेडकरी तरूणांनी दिशाहीन होणे टाळले पाहिजे.फसवणाऱ्या कावेबाजापासून सतर्क राहायला हवे.

प्रदीप जनमाणसाच्या मेंदूत आंबेडकरी विचारांची अग्नीज्वाला पेरत नव्या मूल्यमंथनाची सत्यनिष्ठता दाखवत आहे.देशातील
घडणाऱ्या वाईट प्रसंगामुळे तो संवेदशील होत आहे.आपण लोकशाही व्यवस्थेत नागवले जातो ही किती अन्यायकारक आहे.देशातील शासकिय यंत्रणा कशी सरकारची बाजू घेते याची समीक्षा तो करू लागला.

रात्र झाली होती.घरी आल्यावर आपल्या आई -वडिलांची तगमग पाहू शकत नव्हता .आपण त्यांना
चांगले जीवन देऊ शकत नाही या अस्वस्थतेने तो गदगदून जात होता.मित्रांना क्रांतीसाठी तयार करत होता.आईची क्रांतीऊर्जा मनात संघर्षाकरीता प्रेरणा देत होती.मित्रांच्या साथीने परिवर्तनचा जयघोष करायला तो तयार झाला होता.घरी धुवांधार चर्चा चालायच्या देशातील नागरिकांचे हाल यावर विचारमंथन होत होते.आईने त्यांना देशससेवेसाठी फक्त आंबेडकरी मार्गाचा उपयोग करायचा हा मुलमंत्र दिला होता.छोट्या झोपडीत कामगाराची लढाई लढणारा मँक्झिम गॉर्की याला त्याच्या आईने क्रांतीसाठी तयार केले होते.तशीच प्रेरणा प्रदीपला व त्याच्या मित्रांना मिळत होती.सळसळणाऱ्या तरूणाईच्या रक्ताला योग्य दिशा देण्याचे काम आईची महाऊर्जा करत होती.काभाळकष्ट करून आल्यावरही तीने मुलांना उपदेशाचे डोज पाजले नाही.कारण त्यांचे कार्य समाजशिक्षणाचे होते.
प्रदीपने सरकारच्या बाजूने न जाता जनसामान्याचे मुद्दे घेऊन जनआंदोलन केली.राजकिय लोकांची नौटंकी जनतेसमोर मांडून जनप्रबोधन केले.क्रांतीने जग बदलविण्याची ताकत आंबेडकरवादी साहित्यातून त्यांना मिळत होती.नव्या सूर्याच्या शोधात त्यांनी नवनव्या प्रश्नांचे विश्लेषण केले होते.बाबासाहेबाच्या क्रांतीबोटाची दिशा विचारात घेऊन नव समाजनिर्मितीचा चंग त्यांनी मनी बांधला होता.शेतकरी , कामगार,बेरोजगार,शोषित,पिडीत,आदिवासी,स्त्री यावर होणाऱ्या अत्याचारासाठी तो पेटून उठला होता.सरकारच्या दुप्पटी धोरणाचा निषेध करत महाऊर्जास्वल ज्वाजल्य विचाराची पेरणी माणसाच्या मनामनात करत होता.मेलेल्या मनाला नवी उभारी देण्याचे काम तो करत होता.२०२४ ला नव्या परिवर्तनच्या लढाईला तो तयार झाला होता.भारतातील तरूणांने त्यांला सहकार्य करण्याचे अभिवचन दिले आहे.संघर्ष कठीण आहे पण या शिवाय तरणोपाय नाही म्हणून आपण सारे परिवर्तनचा वसा घेतलेल्या प्रदीपच्या पंखाला नवे ऊर्जाबल देऊ या संविधानात्मक व्यवस्था बळकट करू या.

“प्रदीपच्या क्रांतीकार्याला आपण
उजेडाचे दान देऊ या ।
लोकशाहीच्या महावृक्षाला आपण
प्राणपणाने जपू या ।।
भारताच्या अभ्युदयासाठी आपण
परिवर्तनचा वसा घेऊ या ।
प्रतिगामित्वाच्या फसवेगीरीवर आपण
जोतीरावाचा आसूड ओढू या ।।”