वेल्हाणे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोविडशिल्ड लसीचे लसीकरण संपन्न

29

✒️धुळे प्रतिनिधी(जयदिप लौखे-मराठे)

धुळे(दि.26जून):- धुळे तालुक्यातील वेल्हाणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र शिरुड व उपकेंद्र वेल्हाणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना आजार रोखण्यासाठी कोरोना काळात वेल्हाणे गावातील ग्रामस्थांना कोविडशिल्ड लस देण्यात आली. या लसीकरणाचा पहिला डोस हा 18 ते 44 वयोगटातील नागरीकांना देण्यात आला. वेल्हाणे उपकेंद्राला बुधवार दि.23/06 रोजी राज्य शासनाच्या आदेशानुसार 100 कोविडशिल्ड डोस मिळाले होते. व वेल्हाणे ग्रामस्थांनी पुर्णपणे सहकार्य करुन 100 नागरीकांनी ही लस घेतली. लस ही पुर्णपणे सुरक्षित असल्याचे नागरीकांनी सांगितले.

लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरीकांनी खुप मोठी गर्दी केली होती. लसीकरण केंद्रावर डॉ.आर.एम.पवार, डॉ.हेमंत निमोनकर, डॉ.हिना शेख, डॉ.गंवाडे मॅडम, डॉ.घुले मॅडम, संगिता मराठे, कल्पना बोरसे व कर्मचारी वर्ग आणि जिल्हा परिषद शिक्षिका उपस्थित होत्या.

 

मी स्वतः कोविडशिल्ड लस घेतली असून ती पुर्णपणे सुरक्षित आहे.तरी सर्व नागरीकांनी ही लस घ्यावी. व प्रशासनाला सहकार्य करावे. वेल्हाणे गावाला अजुन काही दिवसात लस मिळवण्यासाठी शंभुसेनेच्या माध्यमातून प्रयत्न करेल. हा विश्वास देतो.- जयदिप लौखे-मराठे(युवा धुळे जिल्हाध्यक्ष शंभुसेना युवा आघाडी)”