घारोड गावाला मिळणाऱ्या धान्य कोट्या मध्ये प्रचंड भ्रष्टाचार- शेकडो लाभार्थी धान्यापासुन वंचित

  43

  🔸प्रशासनाकडून न्याय न मिळाल्यास आंदोलन तीव्र करू- भाई प्रदीप आंभोरे

  ✒️खामगाव प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

  खामगाव(दि.26जून):-सार्वजनिक वितरण प्रणाली मध्ये सर्व ऑनलाईन आहे असे असली तरी प्रत्यक्षात मात्र जिल्हा पुरवठा विभागाच्या तसेच खामगाव तहसील कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे घारोड गावातील सन २०१२ ते २०१३ पासून अनेक केशरी शिधा पत्रीका धारकांना स्वस्त धान्य दुकानातुन धान्य उपलब्ध होत नसल्याने जवळपास ५० ते ६० नागरिकांच्या वतीने भूमी मुक्ती मोर्चा चे भाई प्रदीप आंभोरे यांच्या नेतृवात राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ,पालकमंत्री ना. डॉ.राजेंद्र शिंगणे जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी,उपविभागीय अधिकारी खामगाव,तहसीलदार यांच्या कडे करण्यात आली आहे जिल्हा पुरवठा अधिकारी, उपविभागिय अधिकारी राजेंद्र जाधव, प्रभारी तहसीलदार जगताप यांच्या भेटी घेवून तक्रार दाखल केली आहे.

  घारोड गावाला नागरिकांना मिळणाऱ्या धान्यपुरवठ्यात प्रचंड भ्रष्टाचार होत असून , मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्यामुळे घारोड गावामधील शेकडो केशरी शिधापत्रिकाधारक पासून जवळपास दहा ते बारा वर्षांपासून वंचित राहत आहेंत .

  या तक्रारीमध्ये नमूद आहे की सन २०१६ पासून विभक्त रेशन कार्डधारक शेतकरी शेतमजूर आहोत आम्हाला कुठल्या प्रकारचे कुठल्या योजनेचे धान्य मिळत नाही मात्र कुटुंब व्यक्त करण्या अगोदर आमच्या एकत्रित कार्डावर धान्य मिळत होते मात्र सन २०१६ पुर्वी व नंतर च्या रेशनकार्ड धारकांना धान्य मिळत नाही त्यासाठी स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून तुमचे कार्ड अजून चालू झाले नाही म्हणुण तुम्हाला धान्याचा लाभ होणार नाही

  घारोड गावामध्ये पुर्वीपासुन वर्षापासून रहिवासी असून सुद्धा ज्या वेळेला शेतकरी लाभार्थ्याची धान्य यादी तयार झाली त्यामधून आणि आमचे नाव हीच भावना यातून वगळण्यात आले यामध्ये गावात होणे शेतकऱ्यांची यादीत नाव समाविष्ट झाले मात्र आमचे नाव समाविष्ट झाले नाही यासोबतच काही रेशन कार्ड धारकांची २०१२ ते २०१७ पर्यंत अशा वेळी रेशन कार्ड काढले असून सुद्धा त्यांनाही धान्याचा लाभ होत नाही

  त्यामुळे या धान्य पुरवठा योग्य लाभार्थींना मिळत नाहीत यामध्ये प्रचंड अनियमितता मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून पुरवठा विभाग याकडे लक्ष देत नाहीत

  आम्ही एकत्रित कार्डावर असताना आम्हाला त्यावेळी धान्य मिळत होते आज मात्र धान्य मिळत नाही मात्र सध्याही चा रेशन कार्ड व भरपूर धान्य मिळत असल्याची शासनदरबारी नोंद आहे मात्र यामध्ये प्रचंड अनियमितता भ्रष्टाचार असल्यामुळे आम्ही सर्व स्वस्त धान्यापासून वंचित राहात आहोत असा आरोप नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे

  शासनाच्यावतीने राबविण्यात येणारी पंतप्रधान गरीब कल्याण योजनने चा लाभ मागील वर्षी ची तसेच या वर्षीच्या टाळेबंदीत मिळाला नाही यासंदर्भात खामगाव येथील पुरवठा निरीक्षक भगत यांचेशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून नेहमीच उडवाउडवीची उत्तरं मिळतात मात्र घारोड गावाला खामगाव कार्यालयातून सर्व धान्य पुरवठा होतो असून सुद्धा अतिरिक्त धान्य जाते कोठे याची चौकशी व्हावी या धान्य वाटपाच्या मध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असल्यानेच गरजु स्वस्त धान्यापासुन नागरिक वंचित राहत आहेत हि गंभीर बाब आहे

  जर शासकीय नियमाप्रमाणे एपीएल धान्य मिळत नसेल तर २०१२ पूर्वीच्या त्यानंतरच्या २०१६, २०१७ च्या रेशनकार्ड धारकांचा यादीत का समावेश झाला नाही याची चौकशी व्हावी ५००० लोकसंख्या असलेल्या वस्तीच्या गावाला मोठ्या प्रमाणात धान्य मिळूनही त्याचा योग्य रीतीने वाटप होत नाही. याची चौकशी करून आमचा धान्य पुरवठा सुरळीत करावा अन्यथा आम्ही सर्व नागरिक लोकशाही मार्गाचा अवलंब करून भूमी मुक्ती मोर्चा चे भाई प्रदीप आंभोरे यांच्या नेतृवात आंदोलन करू याची सर्वस्वी जबाबदारी महसूल प्रशासनाने राहील असे तक्रारीत नमूद आहेत.

  या तक्रारीवर सचिन गजानन दांदळे, गोपाल वसंत दुतोंडे ,संजय शामराव धोत्रे,: संदीप रामेश्वर खोमणे, अभिमन्यू श्रीकृष्ण प्ररकाळे, ज्ञानेश्वर संभाजी परकाळे, वहीत खॉ रुस्तम खॉ, भगवान सखाराम खोमने, रामकृष्ण महादेव दुतोंडे, जावेद शहा गुलजार शहा, हारुण शहा बाबा शहा, कलीम शहा बाबा शहा, इब्राहिम शहा याकूब शहा, शरीफशहा, गरीबशहा, जमीर खान आमिर खान पठाण, पुरुषोत्तम महादेव परकाळे, जगन्नाथ वासुदेव बोरे, विष्णू ओंकार बोरे, भगवान ओंकार बोरे, दिलदार खॉ हबिबखॉ, प्रमोद बाबुराव इंगोले यांच्यासह जवळपास शंभर नागरिकांच्या सह्या आहेत