शाहू महाराजांनी बोर्डिंग संस्कृतीमधून शिक्षणाचा विकास घडवला – डॉ.सोपानराव निंबोरे

    36

    ✒️आष्टी प्रतिनिधी (सौ.सरस्वती लाड)

    आष्टी(दि.26जून):-राजर्षी शाहू महाराजांनी बहुजनांसाठी ज्ञानाची दारे खुली केली.सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे.हा त्यांचा मुख्य उद्देश होता.आधी शिक्षण मग स्वराज्य,कारण लोकशिक्षण हाच लोकशाहीचा पाया आहे.सक्तीचे प्राथमिक शिक्षण,बहुजन समाजाच्या उन्नती प्रित्यर्थ शिक्षण,बहुआयामी शिक्षणाचा उद्देश बाळगून त्यांनी कोल्हापूर म्हणजे मल्लविद्येचे विद्यापीठ निर्माण केले.वसतिगृह सर्वांगीण शिक्षण प्रसारा मागील प्रकाशस्तंभ झाला.व्हिक्टोरिया मराठा बोर्डींग हाऊस,दिगंबर जैन बोर्डिंग,वीरर्शैव लिंगायत विद्यार्थी वस्तीगृह,मुस्लिम बोर्डिंग,दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग,श्री.नामदेव बोर्डिंग,पांचाळ ब्राह्मण वसतिगृह,श्रीमती सरस्वतीबाई गौड ब्राह्मण विद्यार्थी वस्तीगृह यांची उभारणी करून सर्व समाजापर्यंत शिक्षण पोहचवले पाहिजे.

    यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी महात्मा ज्योतिबा फुले यांची पेरणी वाढविली.वस्तीगृह शिक्षण वंचितांचे दिपगृह ठरले.शाहू महाराजांनी बोर्डिंग संस्कृतीमधून शिक्षणाचा विकास घडवला.असे विचार प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांनी व्यक्त केले.
    आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,अँड.बी.डी.हंबर्डे महाविद्यालयात शाहू महाराज जयंती निमित्त ते बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.ज्ञानेश्वर नवले,उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे यांनी आपले बहुमोल विचार व्यक्त केले.प्रथम शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.प्रास्ताविक प्रा.डॉ.सखाराम वांढरे यांनी केले.संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सचिव अतुल शेठ मेहेर,दिलीप सेठ वर्धमाने यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या.

    या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे,डॉ.अभय शिंदे,डॉ.सुहास गोपने,डॉ.भगवान वाघमारे,कार्यालयीन अधीक्षिका सरस्वती जाधव,  डॉ.शिरसाट,डॉ.नानवटे,डॉ.
    सुनील मुटकुळे,उपप्राचार्य अविनाश कंदले,प्रा.अशोक भोगाडे,प्रा.सचिन कल्याणकर,प्रा.आनंद देशमुखे,प्रा.सय्यद अलाऊद्दीन,प्रा. संजय कोल्हे,प्रा.वाल्मीक बन,प्रा.विष्णू चौधरी, प्रा.भांडवलकर, प्रा.चंद्रकांत कोकणे आदी उपस्थित होते.शेवटी प्रा.मनीषा देवगडे यांनी आभार मानले.