चिमूर-कांपा रोडवर दोन दुचाकीची टक्कर – दोघांचा मृत्यु तर एक जण गंभीर जखमी

45

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.27जून): – आज दिनांक 27 जून रोजी दुपारी 12:00 वाजता च्या सुमारास चिमुर शहरातिल आर.टी.एम कॉलेज समोर दोन दुचाकीची समोरा- समोर जोरदार टक्कर होऊन दोघांचा जागेवरच मृत्यु झाला तर एक गंभीर जखमी आहे.चिमुर वरुन कांपा कडे अजय महादेव राऊत व सनी (छत्तीसगड) हे एका दुचाकीवर कांपा च्या दिशेने चालले होते.

आणि अतुल चौधरी (नाचणभट्टी) हे आपल्या दुचाकीने कामानिमीत्य चिमुरला येत होते. या दोन्हा दुचाकी मध्ये समोरा – समोर जोरदार टक्कर झाली या घटनेत दोन व्यक्ती चा जागीच मृत्यू झाला असून मृतकामध्ये इंदिरा नगर चिमूर येथील अजय महादेव राऊत व सनी छत्तीसगड यांचा समावेश आहे. अतुल चौधरी नाचणभट्टी हा इसम जखमी असून त्यांचेवर उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचार सुरु आहे. पुढील तपास चिमुर पोलीस करीत आहेत.