ओबीसी आरक्षण प्रश्नी भाजपचे दोन ठिकाणी चक्का जाम आंदोलन

42

✒️माजलगाव प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

माजलगाव(दि.27जून):-स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींना पूर्ववत राजकीय आरक्षण लागू करावे या प्रमुख मागणीसाठी भारतीय जनता पक्ष माजलगावच्या वतीने आज दि.२६ जून रोजी सकाळी ११ वा. राष्ट्रीय महामार्ग क्र.६१ सिंधफना पूलावर,माजलगाव येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे.या आंदोलनात भाजपचे पदाधिकरी व ओबीसी समाज बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाला होता.

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामूळे राज्यातील ओबीसी बांधवांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळणारे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. ओबीसींच्या हक्काचे आरक्षण पूर्ववत मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपने राज्यभरात एकाच दिवशी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज भाजप च्या वतीने माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष आ.चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा ताई मुंडे, बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रीतम ताई मुंडे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शना खाली मतदार संघाचे नेते रमेशराव आडसकर यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे.

यावेळी कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी,नगरसेवक,सरपंच,प.स.सदस्य,बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, शक्ती केंद्र प्रभारी,कार्यकर्ते व सर्व समाज बांधवांनी उपस्थित होते. यावेळी चक्का जाम आंदोलनात माजलगाव विधानसभा चे नेते रमेशराव आडसकर, भाजप तालुका अध्यक्ष अरुण राऊत, बबनराव सोळंके, ज्ञानेश्वर मेंडके, डॉ भगवानराव, हनुमान कदम, सरवदे, दीपक मेंडके, शरद पवार,रमेश पवार ,संजय पवार, जाईकोबा राठोड,ज्ञानेश्वर पवार,प्रशांत पाटील, सुरेश दळावे, विनायक रत्नपारखी, बाळासाहेब क्षिरसागर भगीरथ शेजुळ यांच्या सह ओबीसी समाज बांधव व भाजपचे पदाधिकारी, कार्येकर्ते हजारो च्या संख्येने उपस्थित होते