सळाक चोरीप्रकरणी बकरीस अटक

    36

    ✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

    हिंगणघाट(दि.२७जून):-स्थानिक निशानपुरा वार्ड येथे सुरु असलेल्या नालीचे बांधकाम होत असून उपरोक्त कामासाठी आणलेल्या ५ हजार रुपये किंमतीच्या सळाकीच्या चोरी प्रकरणी परिसरातच राहणाऱ्या आरोपीस काल दि.२६ रोजी मुद्देमालासह अटक करण्यात आली.सदर प्रकरणी माहिती घेतली असता येथील शासकीय बांधकाम कंत्राटदार दिपक मारोतराव पाके रा. रंगारी वार्ड हिंगणघाट यांनी शहरातील स्मशानभुमी रोडवरील रोडचे बाजुला असलेल्या नालीचे बांधकामाकरीता लोखंडी सळाखी आणुन साईटवर ठेवल्या होत्या.

    दिनांक २५ रोजी रात्री अज्ञात इसमाने त्यांचे साईटवरील १० एम.एम. च्या १० नग लोखंडी सळाखी अंदाजे ७० किलो वजनाच्या ५ हजार रुपये किंमतीच्या सळाखी चोरुन नेल्याची तक्रार त्यांनी हिंगणघाट पोलिसांत दिली.सदर तक्रारीवरुन अप. क्रमांक ५५०/२०२१ कलम ३७२ भादविनुसार गुन्हा नोंद करून पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपासात घेतला.गुन्हयाचे तपासात गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड व त्यांचे सहकाऱ्यांनी अवघ्या काही तासातच आरोपी शेख आसिफ उर्फ बकरी शेख रहीम(५०) रा. निशानपुरा वार्ड,हिंगणघाट यांस ताब्यात घेतले,त्याचे घरूनच गुन्हयातील चोरीस गेलेला संपुर्ण मुददेमाल हस्तगत करण्यात आला.

    सदर आरोपीस अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर ,अपर पोलिस अधिक्षक यशवंत सोळंखे, उप विभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम, प्रभारी ठाणेदार प्रशांत पाटनकर यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड, नापोकॉ पंकज घोडे,नापोकॉ सुहास चांदोरे, नापोकॉ प्रशांत वाटखेडे यांनी केली आहे.