राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुकीचे इच्छुक उमेदवारांची चाचपणी

20

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)मो:-9075716526

धुळे(दि.२७जुन):-रोजी राष्ट्रवादी भवन धुळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री.किरण नाना शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी अध्यक्ष श्री.संदीप दादा बेडसे,प्रदेश सचिव श्री.सुरेश सोनवणे,श्री.किरण गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत होवू घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात आली.त्याचप्रमाणे इच्छुक उमेदवारांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी महीला जिल्हाध्यक्षा ज्योतीताई पावरा, युवक प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे,प्रदेश सचिव सुमित पवार, युवक जिल्हाध्यक्ष मयुर बोरसे,,कृ.उ.बा.दों माजी सभापती आण्णासो. विठ्ठलसिंग गिरासे, शिंदखेडा तालुकाध्यक्ष डॉ कैलास ठाकरे, युवती जिल्हाध्यक्षा हिमानी वाघ, युवक तालुकाध्यक्ष चिराग माळी, विधानसभा क्षेत्रप्रमुख दुर्गेश पाटील, कार्याध्यक्ष कमलाकर बागले, जिल्हा उपाध्यक्ष निखील पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष ईश्वर माळी, उपाध्यक्ष दिपक जगताप, डॉ.शांताराम पाटील, ललीत वारूडे,प्रशांत भदाणे,अभय पाटील,विशाल भामरे, योगेश पाटील,विकास ढिवरे,कपील पाटील,युवराज चव्हाण,शाम पाटील आदी उपस्थित होते.