संविधानिक हक्क मिळेपर्यंत आरक्षण हक्क कृती समिती लढणार – मुंबईच्या आक्रोश मोर्चात राजकीय नेत्यांचा निर्धार

24

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.28जून):- छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांची जयंती निमित्त त्यांनी 1902 साली सुरू केलेल्या मागासवर्गीयांचे आरक्षणामुळे सरकार सामाजिक न्याय दिवस साजरा करत आहे मात्र अनुसूचित जाती(SC)जमाती(ST) भटक्या जाती विमुक्त जमाती (DTNT)व विशेष मागास प्रवर्ग (SBC)या मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील 33% आरक्षण बंद करण्याचा शासन निर्णय रद्द केला त्या विरोधात व एकंदरीत बंद करण्यात आलेली फ्रिशिप योजना, शिष्यवृत्ती योजना सुरू करावी.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थी यांना परदेशी शिक्षणातील शिष्यवृत्ती साठीची उत्पन्नाची अट, नोकरीतील साडे चार लाखांचा अनुशेष ,अनुसूचित जाती जमातीवर मोठ्या प्रमाणात जातीयवादी अत्याचाराच्या घटनां,ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व पदोन्नतीतील आरक्षण ,सरकारी उद्योगांचे मोठ्या प्रमाणात खाजगीकरण/ कंत्राटीकरण,कामगार विरोधी कायदे, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचारी, अधिकारी यांच्या कुटुंबियांना सरकारच्या वतीने रु 50/- लाख सहाय्य, कोरोना काळात मोफत रेशन,आदी विविध 16 प्रश्नांसाठी राज्यातील सर्व SC,ST,DT,NT,SBC,OBC च्या कामगार, कर्मचारी,अधिकारी विद्यार्थी संघटना, समाज संघटना यांच्यावतीने राज्यभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर व मुंबई,ठाणे,नवी मुंबई, पालघर जिल्ह्याचा मंत्रालयावर आक्रोश मोर्चाची हाक दिल्यानुसार आरक्षण हक्क कृती समिती मुंबई विभागाच्यावतीने मंत्रालयावर आक्रोश काढला या मोर्चास आरक्षण हक्क कृती समितीचे राज्य निमंत्रक सर्वश्री भटक्या विमुक्तांचे नेते हरिभाऊ राठोड ( माजी खासदार), सुनिल निरभवने ( केंद्रीय अध्यक्ष,आयबीसेफ /कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना), एस के भंडारे (केंद्रीय सरचिटणीस, आयबीसेफ/म्हाडा Mks युनियन), आत्माराम पाखरे (सरचिटणीस, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन ), सिद्धार्थ कांबळे ( सरचिटणीस, सेंट्रल रेल्वे ऑल बँकवर्ड क्लासेस एम्प्लॉईज युनियन), शरद कांबळे (अध्यक्ष, एस सी एस टी बँक असोशीएशन ), डॉ संजय कांबळे बापेरकर( परिसंघ) संजय खामकर (अध्यक्ष, चर्मकार विकास संघ) सागर तायडे ( स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य )तुकाराम मारगाये (आदिवासी हलबा/हलबी समाज संघटना ) यशवंत मलये (ऑल इंडिया आदिवासी अधिकारी कर्मचारी संघटना ) दीपक मोरे ( महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ) यांची भाषणे झाली.

भाषणात सर्वांनी प्रामुख्याने मागासवर्गीयांच्यासाठी व त्यांच्या भावी पीढ़ी साठी संविधानिक हक्क मिळणार नाहीत तोपर्यंत सर्व संघटना व समाज एकजूट होऊन आंदोलन करीत राहू व येणाऱ्या निवडणूकीत मागासवर्गीय समाज आरक्षण विरोधी पक्ष व त्यांच्या उमेदवारास मतदान करणार नाहीत असे जाहीर केले. तसेच या मोर्चास कॉग्रेस पक्षाचे मा.चंद्रकांत हांडोरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) अध्यक्ष राजेंद्र गवई, BRSP चे प्रमुख ऍड. सुरेश माने, धनगर समाजाचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे, मा. आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेचे रमेश जाधव ,रिपब्लिकन पक्षाचे मा. तानसेन ननावरे, शेकापचे अँड.राजू कोरडे इत्यादीं नेते सहभागी होऊन आरक्षण हक्क कृती समितीच्या आंदोलनास पाठिंबा देऊन आम्ही या लढ्यात तुमच्या पाठीशी आहोत असे सांगितले.

या मोर्चात प्रामुख्याने एसटी,मुंबई महानगरपालिका, विद्यापीठ, म्हाडा, शासकीय मूद्रणालय,एमएसईबी, रेल्वे, बँक, सिडको,इन्शुरन्स,मंत्रालय, शिक्षक, प्राध्यापक, इत्यादीच्या विविध संघटनातील कामगार कर्मचारी अधिकारी तसेच एस सी एस टी,आदिवासी, पारधी भटक्या विमुक्त जाती/जमाती, चर्मकार, धनगर समाजाच्या विविध संघटना चे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सरकारने मंत्रालयात मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यास कोणतीही व्यवस्था केली नसल्याने आक्रोश मोर्चाचे निवेदन सहाय्यक पोलीस आयुक्त मा.मिलिंद केसले यांनी स्वीकारले. भारतीय संविधानाचे प्रास्ताविक वाचून सर्वांनी शपथ घेऊन समारोप करण्यात आला.