राष्ट्रपती यांच्या हस्ते निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त काशीकन्या वनमाला पाटील स्टोरी मिरर पुरस्कार विजेत्या

45

✒️नवनाथ आडे(विशेष प्रतिनिधी)

बीड(दि.27जून):-साहित्य क्षेत्रात संपूर्ण देशात उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या स्टोरीमिररच्या ऑथर ऑफ वीक या पुरस्काराच्या मानकरी काशीकन्या ठरल्या आहेत.
नुकतेच भारतीय प्रथम क्रमांक साहित्य व्यासपीठ स्टोरीमिररचे पुरस्कार जाहीर झाले असून त्यात वनमाला ताई विजेत्या ठरल्या आहे.काशीकन्या वनश्री पाटील यांना पूर्वी महामहीम अब्दुल कलाम यांचे हस्ते दिल्लीत अशोका हॉल मध्ये निर्मलग्राम हा पुरस्कार मिळालेला आहे.शिवाय त्यांना ६७ गावांना ओडीएफ करून तालुका पहिला आणलेला आहे.व मुख्यमंत्री मा. अशोक चव्हाण हस्ते {स्वच्छता दिंडीचा} पंढरपूर दिंडी पुरस्कार देण्यात आलेला आहे.

अध्यात्मिक क्षेत्रात त्यांना काशीकन्या म्हणून ओळखल्या जाते तसेच त्यांच्या कार्याचा आढावा घेतला तर त्यांना संतकवयित्री म्हणून देखील त्यांना सबोधले जाते.त्यांनी हिंदू पवित्र धर्म ग्रंथ गीता ही जशी आहे तशी अहिराणी बोली भाषा मध्ये भाषातरीत केलेली आहे. तसेच त्याचे अनेक पुस्तके,कादंबरी, नाटक, इत्यादी साहित्य प्रकारचे एकूण १५ पुस्तके प्रकाशित आहेत.व बत्तीस पुस्तकांना त्याचे मनोगत आहे. साहित्य सामाजिक शिक्षनिक इत्यादी क्षेत्रातील त्यांना एकूण तीस हुन अधिक पुरस्कार प्राप्त आहेत त्यात संत जनाबाई पुरस्कार, काव्यरत्न, आदर्श माता आदर्श शिक्षक स्त्री शक्ती इत्यादी पुरस्कार भेटलेले आहेत इतकेच नव्हे तर त्यांनी हिरकणी साहित्य सेवाभावी रजि संस्था द्यारे निशुल्क अनेक संमेलन भरवून अनेकांना पुरस्कार वाटप करून साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे.

व पुढे ही चालू आहे, स्टोरीमिरर या व्यासपीठ च्या पुरस्कार मिळाल्याबद्दल स्टोरीमिरर परिवारातील मराठी विभाग प्रमुख रोशन मस्के सर, अंगद दराडे यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत,राजश्री मराठे,भाग्यश्री बागड,चंदन तरवडे शालू कृपाले इत्यादीनी त्याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या तसेच अनेक स्तरातुन त्यांचे अभिनंदन केले जात आहे.