आमदार समीर भाऊ कुणावार यांच्या शुभहस्ते गुरुदेव व्यायाम शाळेचे लोकार्पण

26

🔹वृक्षरोपण कार्यक्रमही संपन्न

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.२८जून):-देश सुदृढ़ होण्यासाठी युवकांनी सुदृढ़ होणे आवश्यक असून युवकांनी नित्यनेमाने व्यायाम करण्याचा पायंडा घालावा,असे प्रतिपादन आमदार समिरभाऊ कुणावार यांनी व्यायाम शाळेच्या लोकार्पणसमयी केले.शहरातील कोचर वार्ड येथील गुरुदेव व्यायाम शाळेचा लोकार्पण सोहळा काल दि.२७ रोजी कार्यसम्राटआमदार समिरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी आमदार समिरभाऊ कुणावार यांचे प्रमुख उपस्थितित वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस अंकुश ठाकूर,कार्यकर्ते विनोद दुर्गे, सचिन सावंकार, फडणवीस काकाजी, सचिन कापकर, धीरज हूरकट, आशिष मंडलवार , बंटी जयराज, सचिन कैकाडे, किशोर भाऊ, श्रीकांत भाऊ, प्रशांत मावसकर, शुभम पेटकर, विनोद कोल्हे, आकाश बेले , आकाश सहारे , मनोज जूमडे, विशाल सरकाटे, शिवा मोगरे, धीरज तडस इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.