कोरोना रुग्णांना मोफत उपचार मिळण्याकरिता तहसीलदार निंबाळकर यांना एन.डी.एम.जे संघटनेचा घेराव

19

🔸कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची आंबेडकरी चळवळीच्या विकास धाइंजे व वैभव गिते यांच्याकडे धाव

✒️दिनेश लोंढे(विशेष प्रतिनिधी)

अकलुज(दि.२८जून):- कोरोना कोविड 19 पॉजीटीव्ह रुग्णांना मोफत उपचार मिळण्याकरिता अकलूज विश्रामग्रहाच्या प्रवेशद्वाराजवळ तहसीलदार निंबाळकर यांना नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्यावतीने घेराव घालण्यात आला.महात्मा जोतीराव फुले जणआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालये रुग्णास दाखल करून घेण्यास व उपचार देण्यास टाळाटाळ करीत आहेत.रुग्णांच्या नातेवाईकांपासून अतिरिक्त पैशाची मागणी करीत आहेत.योजनेतील रुग्णास दर्जाहीन जेवण दिले जाते तर काही हॉस्पिटलमध्ये जेवण दिले जात नाही.येण्याजण्याचा प्रवास खर्चसुद्धा देत नाहीत.

हा अनुचित प्रकार थांबवण्यासाठी तहसीलदार यांनी अंगीकृत रुग्णालये,तालुका आरोग्य अधिकारी,सर्व वैद्यकीय अधिकारी,व नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या पदाधिकारी यांची संयुक्त बैठक बोलाविण्यात यावी व कडक सूचना निर्गमित करण्याची मागणी राज्य सचिव वैभव गिते यांनी केली.आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते माळशिरस चे माजी सरपंच विकास दादा धाइंजे यांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करून परवाने निलंबित करण्याची मागणी केली.

माळशिरस तालुक्याचे तहसीलदार निंबाळकर यांनी संबंधितांची बैठक लवकरच लावण्यात येईल असे सांगितले. यावेळी नायब तहसीलदार काळे,वैद्यकीय अधिकारी डॉ.शहा रिपाइंचे अध्यक्ष अभिजित वाघमारे, एन.डी.एम.जे संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्ता कांबळे, नवनाथ भागवत,प्रणव भागवत,प्रबुद्ध युवराज गायकवाड, शिवाजी साळे हे उपस्थित होते.