खा.छत्रपती संभाजीराजे यांचा बीड जिल्हा दौरा- पूर्वनियोजन बैठक आष्टी येथे संपन्न

    102

    ✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

    आष्टी(दि.29जून):-मराठा समाजाला आरक्षणा बरोबरच इतर सवलती मिळाव्यात म्हणून खा.छत्रपती संभाजीराजे यांचा ता.२ जुलै रोजी बीड जिल्हा दौरा होणार आहे.या दरम्यान आष्टी येथील छत्रपती संकुल या ठिकाणी सकाळी ११.३० वाजता मराठा आरक्षणा बरोबरच मराठा समाजासाठी असलेल्या इतर अनेक सुविधा व त्याचा लाभ याबाबत माहिती देणार आहेत.खा.छत्रपती संभाजीराजे यांच्या बीड जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आष्टी येथील पूर्वनियोजनासाठी मराठा आरक्षण राज्य समन्वयक रघुनाथ चित्रे पाटील,उत्तरेश्वर घोडके पाटील व अलोक आगे यांनी आज ता.२९ जून रोजी विश्रामगृह आष्टी येथे धावती भेट देत बैठक घेऊन खा.छत्रपती संभाजीराजे यांच्या दौऱ्याबाबत माहिती दिली.

    या बैठकीला लक्ष्मणराव रेडेकर बाप्पू,भास्करराव निंबाळकर साहेब,प्रा.डॉ.बाबासाहेब मुटकुळे,अशोक दादा चौधरी,महेश सावंत,जालिंदर वांढरे,हौसराव एकशिंगे,दादासाहेब जगताप,तुषार काळे,पत्रकार भाऊसाहेब गाडे व इतर उपस्थित होते.तसेच राजकारण विरहित सर्व पक्षीय व सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी आष्टी येथे विश्रामगृहा समोरील छत्रपती संकुल या ठिकाणी ता.२ जुलै रोजी सकाळी ११:३० वा.मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.