सीआयएसएफ मधे निवड झाल्याबद्दल “इन्स्पायर अकॅडमी” तर्फे ‘मोनालीचा’ सत्कार

24

🔸ब्रम्हपुरी येथील इन्स्पायर करिअर अकॅडमी ची विद्यार्थिनी मोनाली ढोरे देश सेवेसाठी रवाना

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी:- येथील इन्स्पायर करिअर ॲकॅडमी ची विद्यार्थिनी मोनाली ढोरे हिची सीआयएसएफ मध्ये निवड झाली त्याबद्दल इन्स्पायर अकॅडमी तर्फे मोनाली चा सत्कार करण्यात आला मोनाली ही ब्रह्मपुरी तालुक्यातील रणमोचन (खरकाडा) या ग्रामीण भागातील असून शेतकरी कुटुंबातून आलेली आहे. मोनालीला आधीपासूनच देशसेवेची आवड असल्यामुळे महाविद्यालयीन अभ्यासक्रमात एनसीसी घेऊन पोलीस भरती व आर्मी भरतीची तयारी सुरू होती व आपल्या मेहनतीने व जिद्दीने सीआयएसएफ मध्ये तिची निवड झाली. यामधे तिची जीद्य, मेहनत, अभ्यासुवृत्ती इतरांसाठी प्रेरणादायी ठरावी अशीच आहे.

रनमोचन सारख्या लहानशा गावातुन देशसेवेसाठी मोनालीची निवड होणे ही रणमोचन गावासाठी अभिमानास्पद बाब आहे. सदर यश संपादन करुन मोनालीने गावाचे व कुटुंबाचे नाव रौशन केले असुन जिल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कारण या गावातील ही पहीलीच विद्यार्थीनी ठरली आहे. त्यामुळे मोनालीचा सर्व स्थरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मोनालीने सदर निवडीचे श्रेय तीचे आईवडील तसेच इन्स्पायर करिअर अकॅडमी चे मार्गदर्शक वृंद यांना देत पुढे म्हणाली की, मी सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने पुणे, नागपुर सारख्या ठिकाणी जाऊन मला परिक्षेची तयारी करणे शक्य झाले नसते. म्हणूनच कदाचीत इन्स्पायर अकॅडमी नसती तर मला स्पर्धा परीक्षा काय असते याची जानीव झाली नसती. शीवाय वेळोवेळी लाभलेले सर्वोत्कृष्ट असे मार्गदर्शन मला मिळालेच नसते. आणी आज मी यशस्वी झाले नसते व मी देशसेवेला मुकले असते. म्हणुनच माझी झालेली निवड यात इन्स्पायर अकॅडमी चा मोलाचा वाटा आहे अशी मोनाली अभिमानाने सांगते आहे.

सदर सत्काराप्रसंगी इन्स्पायर अकॅडमीच्या संस्थापिका तसेच लिटिल फ्लावर स्कूल च्या प्राचार्य एकता गुप्ता मॅडम, इन्स्पायर अकॅडमीचे संचालक प्रा. लक्ष्मण मेश्राम सर, मार्गदर्शक प्रा. तेजस गायधने सर, दीपक सेमस्कर सर, आंबोरकर सर, खरवडे सर, दीपाली चाचेरे म्याडम राहुल मैन्द ,मंगेश ढोरे व अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते. मोनाली चा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करून तिला शुभेच्छा देऊन देशसेवेसाठी रवाना करण्यात आले. यामुळे मोनाली अगदी भारावुन गेली होती. त्यामुळे इन्स्पायर करिअर अकॅडमी चे मोनालीने तोंडभरून कौतुक केले असुन सर्व मार्गदर्शक यांचे विशेष आभार मानले आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी “इन्स्पायर” अकॅडमी ठरत आहे “दीपस्तंभ”

ग्रामीण भागातील विध्यार्थ्याना स्पर्धा परिक्षेबद्दल जाणीव जागृती व्हावी व त्यांना स्पर्धा परिक्षेबद्दल आवड निर्माण होऊन अगदी माफक दरात स्पर्धा परीक्षा तद्वतच सरळसेवा भरतीची तयारी करता यावी या सोबतच स्पर्धा परीक्षेत ग्रामीण विध्यार्थ्यांचा टक्का वाढावा हा उदात्त हेतू ठेवून या इन्स्पायर अकॅडमीची स्थापना करण्यात आली. पूर्वी विध्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी नागपूर पुणे शिवाय पर्याय नव्हता. आणि हे ग्रामीण भागातील विध्यार्थ्याना शक्य होत नव्हते. परंतु इन्स्पायर अकॅडमीच्या माध्यमातून अनेक मागासवर्गीय अगदी सामान्य कुटुंबातील गोर गरीब तसेच ग्रामीण भागातील विध्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेची तयारी गेल्या १० वर्षापासून अतिशय अत्यल्प दरात करून देण्यात येत आहे. हा एक अभिनव उपक्रम या अकॅडमीने सदोदीत जोपासला आहे. या अकॅडमी चे अनेक विद्यार्थी विविध शासकीय नौकरीत रुजू झाले आहेत. त्यामुळे इन्स्पायर करिअर अकॅडमी ग्रामीण विद्यार्थ्याना दीपस्तंभच ठरत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही हे मात्र तेवढेच खरे!