पूर बाधित क्षेत्रात मोडणाऱ्या रणमोचन गावाचा पुनर्वसनाचा मुद्दा आता पूर्ण होईल काय?

22

🔸मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून अपेक्षा.

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.30जून):-भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील गोसे गावाजवळ वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या प्रकल्पाचा भूमिपूजन शुभारंभ पाच-सहा दस का अगोदर सुरुवातीला लाडके प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या हस्ते करण्यात आला होता त्याच वेळी इंदिरा सागर प्रकल्प असे नामकरण करण्यात आले होते मात्र कालांतराने गोसीखुर्द प्रकल्प असे नामकरण देण्यात आले त्या अगोदर सन 1962,1965, मध्ये हा धरण पूर्णत्वास आला नसतानासुद्धा ह्याच वैनगंगा नदीला महापूर येऊन अनेक घरांची पडझड झाली होती त्यात अनेक कुटुंब उघड्यावर पडले होते मात्र त्यानंतर शासनाने नदीकाठा लगत असलेल्या अनेक गावातील कुटुंबाचे पुनर्वसन करण्याचे शासनाकडून आश्वासन दिले गेले होते.

त्यामध्ये ब्रह्मपुरी तालुक्यातील बहुतांशी गावांपैकी लाडज रुई निलज पाचगाव यांचे जवळपास 1972-1974 मध्ये पुनर्वसन करण्यात आले त्यानंतर गोसीखुर्द प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर सन 1994 मध्ये धरण तुडूंब भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पुन्हा वैनगंगा नदीला महापूर आला होता त्यावेळीही पुनर्वसनाचा मुद्दा ऐरणीवर आला असताना सुद्धा त्यावेळचे तत्कालीन (मंत्री ) तथा खासदार विलास मुत्तेमवार यांनी रनमोचन गावाचा पुनर्वसनाचा हा मुद्दा सुद्धा रेटून धरला होता पण मात्र त्यात पाणी कुठे? मुरले काही कळले नाही शिवाय त्यावेळीसुद्धा लोकांचे बेघर झालेत केवळ ताट- व्यांच्या व ताडपत्रीने ,(तंबू) बांधलेल्या घरात लोकांना बरेच दिवस काढावे लागले मात्र त्यानंतर कोणीच राजकीय नेते मंडळी पुढे सरसावले नाही.

आणि पुन्हा एकदा 29 व 30 ऑगस्ट 20 20 रोजी मध्यप्रदेशातील संजय सरोवरातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदी काठालगत असलेल्या गावांना कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा गोसीखुर्द प्रकल्पातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा नदीला पुन्हा महापूर आला त्यातही अनेक घरांची पडझड होऊन सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी रण मोचन गावाला भेट देऊन पुनर्वसनाचा मुद्दा पूर्ण करण्याचे आश्वासन जरी दिले असले तरी खुद्ध ते त्या खात्याचे मंत्री असताना तरी नेतृत्वात आता पुनर्वसन होईल अशी अपेक्षा? रन मोचन गाव वासियांना आहे.

त्याशिवाय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा रणमोचन गावाला भेट दिली असतांना ग्रामस्थातर्फे त्यांना सुद्धा पुनर्वसन सबंधित निवेदन देण्यात आले .गेल्या सात-आठ दिवस आगोदर रणमोचन येथील सरपंच नीलिमा नीलकंठ राऊत यांनी यासंदर्भात मंत्री विजय वडेट्टीवार यांना पुनर्वसनाच्या संबंधाने निवेदन सुद्धा दिले गेले आहे त्यामुळे आता तरी रनमोचन गावाचे पुनर्वसन होईल अशी अपेक्षा जनतेला आहे.